आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jamna Present To Police Today In Narayan Sai Case

नारायण साईच्‍या मूलाची आई जमुना पोलीसांना शरण, अनेक खुलाशांची शक्‍यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत- बलात्‍काराच्‍या आरोपाखाली अटकेत असलेल्या नारायण साईच्‍या मुलाची आई साध्‍वी जमुना पोलीसांना शरण आल्‍यामुळे नारायण साईबद्दल आणखी पुरावे मिळणार असल्‍याची माहिती साहायक पोलिस आयुक्त मुकेश पटेल यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी साध्‍वी जमुनाला अटक करण्‍यासाठी सुरत पोलीसांनी कोर्टात अर्ज केला होता. याचा निर्णय येण्‍याअगोदर साध्‍वी जमुना पोलीसांना शरण आली, अशी माहिती पटेल यांनी दिली.

नारायण साईने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. नारायण साईच्‍या सेविका म्‍हणून काम पाहणा-या गंगा व जमुना या बहिणी या शोषणाला जबाबदार असल्‍याचा आरोप एका पीडित महिलेने केला आहे. साईला अटक करण्‍यापूर्वीच गंगा या सेवीकेला अटक करण्‍यात आली होती. परंतु जमुना मंगळवारपर्यंत फरार होती.

पुढील स्‍लाईडवर वाचा गंगा व जमुना या बहिणीबद्दल......
-----------