आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी हो म्हटले तर त्यांच्यासोबत रहायला आजही मी तयार - म्हणाल्या जशोदाबेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा- नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी म्हटले आहे की, जर मला पंतप्रधान यांच्या शपथविधीचे निमंत्रण मिळाले तर मी जरूर जाईन. मोदी यांची पत्नी असल्याचा मला गर्व आहे. तसेच पंतप्रधान यांच्या निवासस्थानी राहण्यास बोलावले तर मला नक्कीच राहायला आवडेल. मोदी देशाचे पंतप्रधान बनले आहेत याचा मला खूप आनंद झाला आहे.
तीर्थयात्रेवरून परत आलेल्या जशोदाबेन यांनी शुक्रवारी एका गुजराती चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जेव्हा मोदींनी 9 एप्रिल रोजी बडोद्यातून लोकसभेसाठी प्रतिज्ञापत्र दाखल केले तेव्हा त्यांनी माझा प्रथमच सार्वजनिकरित्या पत्नी म्हणून दर्जा दिला तेव्हा मला खूप आनंद झाला. या सगळ्या घडामोडीमुळे मी उत्साहित झाले आहे. सगळ्या देशाला जेवढा मोदी पंतप्रधान बनल्याचा आनंद झाला आहे तेवढाच मलाही झाला आहे.
आणखी पुढे वाचा, काय म्हणाल्या जशोदाबेन...