आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : \'भाजपचा अहंकार मोडीत काढू\', राहुल गांधींबरोबर भेटीनंतर म्हणाले, जिग्नेश मेवाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ अहमदाबाद - दलित अधिकार मंचचे नेते जिग्नेश मेवाणी यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. नंतर मीडियाशी बोलताना जिग्नेश म्हणाले, आम्ही भाजपचा अहंकार मोडीत काढू. हा पक्ष जनतेच्या विरोधात काम करते. जिनग्नेश असेही म्हणाले की, राहुल आमच्या 90% मागण्यांशी सहमत आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 18 डिसेंबरला होईल. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

आमच्या मागण्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याचे आश्वासन... 
- जिग्नेश आणि राहुल गांधी यांची भेट नवसारीमध्ये झाली. जिग्नेश म्हणाले, राहुल यांच्याबरोबर आमची सुमारे 17 मागण्यांवर चर्चा झाली. त्यांनी आमच्या मागण्या जाहिरनाम्यामध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले आहे. मेवाणी असेही म्हणाले की, भाजप आमचे काहीही ऐकत नाही. भाजप आणि राहुल गांधी यांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. 
- राहुल गांधींसी भेट होण्यापूर्वी जिग्नेश यांनी भाजपवर हल्ला चढवला. गुजरातच्या जनतेला भाजपपासून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे. मेवाणी म्हणाले की, जर काँग्रेसने आमच्या मागण्या मान्य केल्या तर ते काँग्रेसला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहेत. 

दलितांच्या प्रश्नांवर बोलायला भाजपची तयारी नाही 
- यापूर्वी मंगळवारी जिग्नेश आणि राहुल गांधी यांच्या भेटीबाबत बातम्या आल्या होत्या. पण जिग्नेश यांनी ट्वीट करून भेटीच्या बातम्या फेटाळल्या होत्या. ट्वीटमध्ये ते म्हणाले होते, भेटलो तर सर्वांना सांगून भेटू. आम्ही राहुल गांधी किंवा इतर कोणत्याही नेत्याला भेटलो तर, स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे तर दलित समाजाच्या ज्या प्रश्नांवर बोलायला भाजप तयार नाही, त्या प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका जाणून घेऊ. 
 
 
बातम्या आणखी आहेत...