आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या घरातही चालला झाडू, दिग्गज नेते कनुभाई कलसरिया \'आप\'मध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - निरमा सिमेंट प्लँटच्या मुद्यावर गुजरात सरकार आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडणारे भाजपचे दिग्गज नेते आणि माजी आमदार कनुभाई कलसरिया यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाने गुजरात भाजपात खळबळ माजली आहे. आज (बुधवार) सकाळी कनुभाई आपच्या कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी रितसर पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. त्यानंतर त्यांनी आपचे चिन्ह झाडू हातात घेतला आणि समर्थकांना अभिवादन केले.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना कनुभाई म्हणाले, 'मी तीन वेळा भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडूण आलो. मात्र पक्षनेत्यांनी एकदाही माझे म्हणणे ऐकून घेतले नाही. आता मी 'आप' मध्ये प्रवेश केला असून 'झाडू'ने गुजरातमधील सर्व कचरा साफ करणार आहे.'
कनुभाई अहमदाबादमध्ये येणार असल्याचे कळाल्यानंतर त्यांचे समर्थक सकाळपासूनच आपच्या कार्यालया बाहेर जमा झाले होते. आपला देशभरातून समर्थन मिळत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कनुभाईंनी 'आप'मध्ये प्रवेश करण्यापूर्वीच गुजरातमध्ये पक्षाचे 85 हजार प्राथमिक सदस्य झाले आहेत. 'आप'ने गुजरातमध्ये जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कनुभाईंच्या शक्तीप्रदर्शन