आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केशुभाई पटेल सक्रिय राजकारणातून निवृत्त; मतदारसंघात जाऊन केली घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट- गुजरातचे माजी मुख्यमंत्री व 86 वर्षीय ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी बुधवारी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यांनी आपल्या विसावदर-भिसन मतदारसंघात जाऊन लोकांना याबाबतची माहिती दिली. वाढते वयोमान आणि प्रकृतीमुळे थांबत असल्याचे कारण देत त्यांनी आपल्या गुजरात परिवर्तन पार्टीने (जीपीपी)भाजपमध्ये विलीन व्हावे, असा सल्ला दिला. पटेल यांनी अलीकडेच गुजरात परिवर्तन पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यांचे पुत्र भारत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मी कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होण्याचा विचार केला नाही. मात्र, जीपीपीने कॉँग्रेस सोडून राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावे, असे पटेल यांनी सांगितले. त्यांनी यातून भाजपमधील विलीनीकरणाचे संकेत दिल्याचे मानले जाते. भाजपचे मुख्यमंत्री व सहा वेळा आमदार राहिलेल्या केशुभाई यांना नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर पक्षातून बाहेर पडणे भाग पडले. त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीआधी सप्टेंबर 2012 मध्ये जीपीपीची स्थापना केली होती. केशुभाई विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.

मोदीप्रकरणी अमेरिकेचे धोरण
गुजरात दंगलीतील मोदींच्या कथित भूमिकेचे कारण पुढे करत अमेरिकेने सन 2005 मध्ये मोदींचा व्हिसा रद्द केला होता. धार्मिक स्वातंत्र्याची पायमल्ली केल्याचा गंभीर आरोप ठेवून अमेरिकी कायद्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.नऊ वर्षांपासून अमेरिकेने राजदूत पातळीवरही मोदींशी संपर्क ठेवला नव्हता. आता अचानक मोदींची वेळ मागितल्याने भाजपच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे. हा मोदींच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम असल्याचे भाजपने म्हटले आहे.

कोणाचीही बाजू घेणार नाही
आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाच्याही अनुकूल भूमिका घेणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले. भारतासोबतच्या संबंधांबाबत आम्ही भारतातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो, असे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, केरळमधील चहावाल्यांशी मोदींचा व्हीसीद्वारे संवाद