आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या... कुठे आहेत नरेंद्र मोदींचे चार भाऊ आणि एक बहिण ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे मुख्‍यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे शक्‍तीशाली नेते नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्‍या प्रचार समितीचे अध्‍यक्षपद देण्‍यात आले आहे. यानिमित्ताने आम्‍ही तुम्‍हाला मोदींच्‍या भाऊ-बहिणींविषयी आणि त्‍यांच्‍या संपूर्ण कुटुंबियांविषयी सांगणार आहोत. सहा भाऊ-बहिणींच्‍या मध्‍यमवर्गीय कुटुंबात नरेंद्र मोदींचा जन्‍म झाला, तेव्‍हा त्‍यांच्‍या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नव्‍हती. त्‍यावेळी त्‍यांचे वडील पिठाची गिरणी चालवायचे. त्‍यानंतर त्‍यांनी रेल्‍वे स्‍टेशनवर चहाचे दुकान सुरू केले होते. तिथे मोदीही ग्राहकांना चहा देण्‍याचे काम करीत असत.

मध्‍यमवर्गीय कुटुंबिय असले तरी मोदींचे भाऊ-बहिण सुशिक्षीत आहेत. आर्थिक स्थिती चांगली नसतानाही मोदींच्‍या वडीलांनी मुलांच्‍या शिक्षणात कोणतीच कसर सोडली नाही. मोदींचे वडील दामोदर दास हे आता हयात नाहीत. मोदींची आई हिराबा आधी वडनगर येथील आपल्‍या जुन्‍या घरी एकटया राहत. मात्र, गेल्‍या काही दिवसांपासून प्रकृती अस्‍वस्‍थामुळे त्‍या मोदींचे सर्वात लहान भाऊ पंकजभाईंकडे गांधीनगर येथे राहतात. बारावी झाल्‍यानंतर मोदींनी घर सोडले होते. त्‍यानंतर त्‍यांनी अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्‍समधून पदवी घेतली.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या मोदींचे भाऊ-बहिण कोठे राहतात आणि काय करतात...