आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या अंत्ययात्रेतच तिने घेतला होता ठाम निर्णय, लग्न करायचे तर भाऊजींशीच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावेश, स्मित, कोमल, इन्सेट मृत बहीण अवनी. - Divya Marathi
भावेश, स्मित, कोमल, इन्सेट मृत बहीण अवनी.
राजकोट - अपघातानंतर जेव्हा बहिणीचा अंत्यसंस्कार होत होता त्याचवेळी तिने ठरवले होते की, आता लग्न करायचे तर भाऊजींबरोबरच करायचे. लग्नानंतर दुसऱ्याच क्षणी मी आई बनले तीही माझ्याच भाचीची. याचा आनंद असल्याचे ती म्हणाली. मावशीपासून आई बनणाऱ्या कोमलने सांगितले की, जेव्हा ती स्मितची मावशी होती तेव्हाही त्याच्यावर आईप्रमाणेच प्रेम करायची. पण यासाठी कुंटुंबीयांना राजी करायला फार त्रास झाला असे ती म्हणाली.

8 वर्षाच्या भाच्याचा प्रश्न होता..
माझ्यासमोर 8 वर्षांच्या अपंग भाच्याचा प्रश्न होता. जेव्हा मी कुटुंबाला सांगितले की, मला स्मितची आई बनायचे आहे तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. अगदी माझे भाऊजी भावेश यांनाही आश्चर्य वाटले. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे असे त्यांनी मला समजावले असे कोमल म्हणाली. पण जर भावेशने दुसरे लग्न केले तर दुसरी पत्नी स्मितला खरंच आपलं मानेल का? जर तिला ते शक्य झाले नाही तर, काय करायचे असे तिने इतर सर्वांना विचारले. त्यानंतर सगळे कुटुंबीय राजी झाले.

बहीण होती, तेव्हाही स्मितला आईप्रमाणेच प्रेम करायचे..
माझी बहीण जीवंत होती त्यावेळीही मी स्मितला आईप्रमाणे प्रेम करायचे असे कोमलने सांगितले. तोही आईपेक्षा जास्त वेळ मावसी कोमलबरोबरच असायचा. त्यामुळे दुसऱ्या कोणावर त्याची जबाबदारी कशी टाकणार. लग्नाच्या आधीच मला त्याची आई होता आले हे मी माझे नशीब समजते.

पत्नीच्या मृत्यूनंतर होती मुलाची चिंता...
जामनगरच्या मंडप सर्व्हीसचा बिझनेस करणाऱ्या भावेशने सांगितले की, पत्नीच्या मृत्यूनंतर त्याला मुलाची चिंता वाटत होती. दुर्घटनेत स्मितने एक हात गमावला होता. त्यामुळे पुढे कसे होणार हा विचारच मी करू शकत नव्हतो. पण कोमलच्या एका विचाराने माझे पूर्ण आयुष्यच बदलले. मी कोमलला समजावण्याचाही प्रयत्न केला. पण स्मितसाठी तिचे प्रेम पाहून मी होकार दिला.

कोमलचा साहसी निर्णय..
जेतपूरच्या नवागडमध्ये राहणाऱ्या चंदुभाई सावलिया यांची मुलगी अवनी हिचा जामनगरच्या भावेशबरोबर विवाह झालेला होता. त्यांना स्मित नावाचा एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी एका अपघातात अवनी यांचा मृत्यू झाला. त्यात स्मितचा उजवा हातही कापला गेला. त्यामुळे सगळ्यांना स्मितच्या भविष्याची चिंता होती. पण अवनीची लहान बहीण कोमलने अगदी साहसी निर्णय घेत स्मितची आई बनण्याचा निर्णय घेतला. समाजानेही कोमलच्या साहसी निर्णयाचे स्वागतच केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...