आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतीशील गुजरातमध्ये मुलाचे कलेवर खांद्यावर घेऊन निघाले वडील, माणुसकी शरमेने झुकली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशोरवयीन पुतण्याचा मृतेदह खांद्यावर घेऊन निघालेला त्याचा काका. - Divya Marathi
किशोरवयीन पुतण्याचा मृतेदह खांद्यावर घेऊन निघालेला त्याचा काका.
सापुतारा (गुजरात) - हा तरुण एवढा घामाघूम का झाला असेल ? एवढे कोणते ओझे घेऊन तो निघाला की पावसाळ्यातही त्याचे शरीर घामाने भिजले आहे ? तर त्याचे उत्तर आहे, गतीशील गुजरातमधील मेलेल्या माणूसकीचे ओझे तो वाहात आहे. गुजरातच्या प्रगतीच्या बाता नॅशनल-इंटरनॅशनल स्टेजवर नेहमी होत असतात, मात्र त्याच गुजरातमध्ये अधून-मधून उणा आणि असे दृष्य समोर येते, ज्यामुळे माणुसकीलाही शरमेने मान खाली घालावी लागते.
मुजरी करणाऱ्या एका कुटुंबातील मुलाचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. बालकाचा मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी हॉस्पिटलने शववाहिणी देण्यास नकार दिल्यामुळे अखेर पित्याला दुःखावेग आवरुन बालकाचे कलेवर खांद्यावर टाकून भरबाजारातून जावे लागले.
कुठली आहे घटना
- डांग जिल्ह्यातील वघई तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य केंद्रात दुसऱ्या जिल्ह्यातून मोल-मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील मिनेश केशुभाई पलास या मुलाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा येथे मृत्यू झाला.
- किशोरवयीन मुलाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. सरोज पटेल यांच्याकडे शववाहिणीची मागणी करण्यात आली.
- पीडित कुटुंबाने डॉक्टरांपुढे हात जोडले, त्यांची विनवणी केली. मात्र शववाहिणीचा ड्रायव्हर सुटीवर गेल्यामुळे त्यांनी शववाहिणी देण्यास नकार दिला.
- मोल-मजुरी करुन उदरभरण करणाऱ्या कुटुंबाकडे जेवढी जमापुंजी होती ती उपचारात खर्च झाली होती. आता घरी परत कसे जायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.
- अखेर मुलाचा काका बोलाभाई दीपाभाई पलास याने पुतण्याचे कलेवर खांद्यावर घेतले आणि वघई बाजारातून निघाला. हे दृष्य पाहून काही लोकांनी पलास कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे केला आणि वाहनाची व्यवस्था करुन दिली. मात्र प्रशासनाकडून त्यांना कोणतीही मदत झाली नाही.
प्रशासनाने आरोप फेटाळला
काही दिवसांपूर्वीच ओडिशामध्ये पत्नीचा मृतदेह घेऊन जात असलेला व्हिडिओ समोर आला होता. या घटनेबद्दल संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त झाली होती. त्यानंतरही प्रशासन किती निगरगट्ट असते हे गुजरातमधील वघई येथील डॉक्टरांनी दाखवून दिले.
वघई येथील घटनेबददल डांगचे जिल्हाधिकारी म्हणाले, की वधईच्या या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांना मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहनाचीही व्यवस्था करुन देण्यात आली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा मुलाचे कलेवर घेऊन निघालेले काका...
बातम्या आणखी आहेत...