आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात गुजरात पिछाडीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जन्मदर आणि प्रसूतीकालीन माता मृत्युदराचे प्रमाण रोखण्यात गुजरातला राष्ट्रीय सरासरी गाठण्यात अपयश आले आहे. अनेक क्षेत्रात आघाडी घेणारे गुजरात आरोग्याच्या पातळीवर मात्र पिछाडीवर पडले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालात सोमवारी गुजरातचे वास्तव समोर आले आहे. 2005 ते 2011 या काळात मुलांचे वाचण्याचे प्रमाण 2.8 टक्क्यांवरून 2.4 टक्क्यांवर आले आहे, असे नमुना नोंदणी व्यवस्थेच्या (एसआरएस) दस्ताऐवजावरून स्पष्ट झाले आहे.
याच काळात राष्ट्रीय पातळीवरील सरासरी प्रमाण 2.9 वरून 2.4 टक्क्यांवर आले. गुजरातने प्रसूतीकाळातील माता मृत्युदरात 23.75 टक्क्यांनी घसरण झाली आहे. बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यातही गुजरातला अपेक्षित यश आल्याचे दिसून येत नाही. सरासरी राष्ट्रीय पातळीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षी त्याची सरासरी प्रमाण 29.63 टक्के नोंदवण्यात आली.
राष्ट्रीय पातळीवर बालमृत्यूचा दर या काळात 27.5 टक्के दिसून आला. अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजनांवरील निधीचे राज्य सरकारने नक्की काय केले, यावरही अहवालातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
केंद्राची मदत किती ?
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेच्या माध्यमातून केंद्र सरकारने राज्याला 2013 -14 साठी 4 हजार 164 कोटी रुपये दिले होते. यातील 608 कोटी रुपये खर्च झाले. गुजरातमधील एकूण 1 हजार 158 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी केवळ 101 पूर्णवेळ कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले.
काय आहे एमसीटीएस?
प्रसूती काळातील माता मृत्युदर आणि मुलांचे आरोग्य तपासण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एमसीटीएस ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेअंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात अशी व्यवस्था आहे. एमसीटीएसद्वारे करण्यात आलेल्या परीक्षणात 42 लाख 17 हजार 965 गरोदर आणि 30 लाख 73 हजार 905 मुलांची नोंद करण्यात आली होती.
माता मृत्युदराचे वास्तव
(आकडे एक लाखामागील सरासरी प्रमाण दर्शवणारे)
वर्ष संख्या टक्केवारी
2004-06 160 23.72 टक्के
2010-12 122 29.9 टक्के
बाल मृत्युदर
(आकडे 1 हजार बालकांमागील सरासरी)
2005 - 54 2012 - 38