आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वामीनारायण पंथाचे प्रमुख स्वामी महाराज अनंतात विलीन, पूर्ण केली अंतिम इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांरगपूर येथील स्वामी नारायण पंथाच्या प्रमुख मंदिर आवारात प्रमुख स्वामी महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. - Divya Marathi
सांरगपूर येथील स्वामी नारायण पंथाच्या प्रमुख मंदिर आवारात प्रमुख स्वामी महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सांरगपूर (बोटाड जिल्हा, गुजरात)- बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम संप्रदायाचे (बीएपीएस) प्रमुख स्वामी महाराज यांचे गेल्या रविवारी (14 ऑगस्ट) येथे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सारंगपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, प्रख्यात कथाकार मोरारी बापू, योगगुरु रामदेव बाबा, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, उद्योगपती अनिल अंबानी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पंचामृताने केला अभिषेक
प्रमुख स्वामी महाराज यांच्या पार्थिवावर पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गंगाजल देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 'ओम स्वामी नारायण नम:' चा निनाद सर्वत्र सुरु होता. मंगळवार रात्रीपासूनच येथील मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक जमण्यास सुरवात झाली होती. काल दुपारी तीनच्या सुमारास महाराजांचे पार्थिव मंदिर परिसरात आणण्यात आले. त्यानंतर काही वेळाने मुखाग्नी देण्यात आला.
पूर्ण केली अंतिम इच्छा
सांरगपूर येथील मुख्य मंदिराच्या परिसरात भगवान स्वामी नारायण आणि प्रमुख स्वामी यांचे गुरु शास्त्रीजी महाराज यांच्या मंदिरांच्या सरळ रेषेवर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी या ठिकाणी एक चबुतरा तयार करण्यात आला होता. स्वामी नारायण आणि गुरु शास्त्रीजी यांच्यासमोर अंत्यसंस्कार करण्यात यावा अशी प्रमुख स्वामी यांची अंतिम इच्छा होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, स्वामीनारायण पंथाचे प्रमुख स्वामी महाराज यांच्या अंत्यसंस्काराचे फोटो... शोकाकूल भाविक...
बातम्या आणखी आहेत...