Home »National »Gujarat» Latest News For Asaram Narayan Sai Surat Rape Case

आसाराम यांचा जमीन अर्ज फेटाळला, दिवाळी तुरुंगातच; नारायण साईच्या शोधात छापेमारी

दिव्य मराठी वेब टीम | Oct 30, 2013, 18:53 PM IST

  • आसाराम यांचा जमीन अर्ज फेटाळला, दिवाळी तुरुंगातच; नारायण साईच्या शोधात छापेमारी
गांधीनगर/जोधपूर - सुरतच्या दोन बहिणींपैकी एकीवर बलात्काराच्या आरोपात तुरुंगात असलेले आसाराम यांचा जामीन अर्ज गांधीनगर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे आसाराम यांना दिवाळी आता तुरुंगातच साजरी करावी लागणार आहे. याआधी जोधपूर कोर्टाने अल्पवयीन विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसाराम यांच्यासह चार जणांची न्यायालयीन कोठडी 6 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. सुरत बलात्कार प्रकरणी आसाराम यांचा मुलगा नारायण साई देखील आरोपी असून तो फरार आहे. मंगळवारी सुरत कोर्टाने त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वॉरंट जारी झाल्यानंतर तत्काळ छत्तीसगडमधील रायपूर येथील आश्रमावर छाप टाकण्यात आला. याशिवाय नारायण साईच्या शोधात पोलिसांनी इतरही ठिकणी छापे टाकले आहेत.

Next Article

Recommended