आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi CBI Gives Clean Chit To Amit Shah In Ishrat Jahan Encounter Case

इशरत जहाँ प्रकरण: मोदींचे निकटवर्तीय अमित शहांविरुद्ध सबळ पुरावे नाही, CBIकडून क्लीन चिट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - नरेंद्र मोदींचे विश्वासू आणि गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शहा यांना वादग्रस्त इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) क्लीन चिट दिली आहे. शहांविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने आरोपपत्रामध्ये त्यांचे नाव नाही, असे शपथपत्र सीबीआयने न्यायालयात सादर केले आहे.

इशरतचा साथीदार जावेदच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची मागणीही सीबीआयने केली आहे. विशेष सीबीआय न्यायालयात बुधवारी सीबीआयचे पोलिस निरीक्षक विश्वासकुमार मीणा यांनी शपथपत्र दाखल केले.

सीपीदेखील मोकळे
तत्कालीन पोलिस आयुक्त कौशिक यांनाही सीबीआयने क्लीन चिट दिली आहे. अधिक तपास आणि आतापर्यंत गोळा केलेल्या पुराव्यानुसार कौशिक यांचा हत्याकांडाच्या कटामध्ये सहभाग नव्हता, असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांचे नाव साक्षीदार म्हणून पुरवणी आरोपपत्रामध्ये टाकण्यात आले, असेही सीबीआयने सांगितले.