आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi, Gujarat Judge Accused Of Molestation Arrested

गुजरातमध्ये न्यायाधीशांनी केले महिला सहकर्मचाऱ्याचे तीन महिने लैंगिक शोषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वलसाड (गुजरात)- महिला सहकर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी लेबर कोर्टाच्या न्यायाधीशांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. परंतु, न्यायालयात सादर केल्यानंतर लगेच जामीन मिळाल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे.
न्यायाधीश डी. एस. चौधरी असे त्यांचे नाव आहे. 47 वर्षीय न्यायाधीशांवर महिला सहकर्मचाऱ्याला जबरदस्तीने दारु पाजणे, लैंगिक शोषण करणे आणि पाठलाग करणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. गुजरात उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्यावर न्यायाधीशांना अटक करण्यात आली होती.
यासंदर्भात पोलिस आयुक्त निपूर्ण तोरावाने यांनी सांगितले, की आम्ही न्यायाधीशांना वलसाड शहरातून अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पीडित महिलेने पोलिस तक्रार निल्यानंतरही न्यायाधीशांनी महिलेला फोन कॉल्स केले होते. महिलेच्या कॉल्स रेकॉर्डची माहिती घेण्यात येत आहे.
असे आहे प्रकरण
पोलिसांनी सांगितले आहे, की लेबर कोर्टाचे न्यायाधीश डी. एस. चौधरी त्यांच्या महिला टायपिस्टचे गेल्या तीन महिन्यांपासून शारीरिक शोषण करीत होते. याची माहिती महिलेने तिच्या आई-वडीलांना दिली होती. ही महिला वलसाड येथील रहिवासी आहे. गेल्या गुरुवारी महिला तिच्या वडीलांसोबत दुचाकीवर घरी येत होती. यावेळी या न्यायाधीशांनी तिचा पाठलाग केला. तिच्या घराजवळ आले. त्यानंतर महिलेच्या वडीलांनी न्यायाधीशांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीही ते माघारी जाण्यास तयार नव्हते. यामुळे शेजारी गोळा झाले. त्यांनी न्यायाधीशांना मारहाण केली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना न्यायाधीशांच्या कारमध्ये बिअरच्या बॉटल सापडल्या.
परंतु, न्यायाधीशांना लगेच अटक करणे शक्य नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार न्यायाधीशांना अटक करायची असेल तर उच्च न्यायालयाची परवानगी लागते. त्यामुळे आधी उच्च न्यायालयाची रितसर परवानगी घेऊन त्यांना अटक करण्यात आली.