आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Muslim Youths Barred At Garba Venues In Godhra

गोध्राः गरब्यापासून मुस्लिम युवकांना दूर ठेवण्यासाठी 1500 स्वयंसेवकांची फौज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- गरबा महोत्सव)
गोध्रा (गुजरात)- विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी गरब्यापासून मुस्लिम युवकांना दूर ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यासंदर्भात परिषदेचे महासचिव प्रविण तोगडिया आणि इंदुर येथील भाजपचे आमदार उषा ठाकूर यांनी आधीच घोषणा केली आहे. नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या हिंदू अस्मिता हितरक्षक समिती नावाच्या संस्थेने 1500 स्वयंसेवकांची फौज तयार केली आहे. मुस्लिम युवकांना गरब्यापासून दूर ठेवण्याचे काम या स्वयंसेवकांकडून केले जाणार आहे.
हिंदू अस्मिता हितरक्षक समिती या संस्थेची अद्याप नोंदणी झालेली नाही. परंतु, विश्व हिंदू परिषदेचे नेते आशिष भट्ट यांनी सांगितले आहेत, की या संस्थेला परिषदेचे समर्थन आहे. नवरात्र महोत्सव 25 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गरबा नृत्य आयोजित केले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये लव्ह जिहादची अनेक प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामुळे हिंदू संघटनांनी ही पावले उचलली आहेत.
वंदे मातरम् न म्हणणाऱ्यांना गरब्यात सामिल करु नये
हिंदू मुलिंना पटवण्यासाठी मुस्लिम युवक गरब्याचा उपयोग करतात, असा आरोप या समितीने केला आहे. यामुळे खास व्यवस्था करण्यात आली आहे. या समितीचे नेते जैमिन शाह म्हणाले, की जर मुस्लिम वंदे मातरम् म्हणण्यात समस्या असेल तर त्यांना आम्ही गरब्यात का प्रवेश द्यायचा. पण काही आयोजकांनी सांगितले आहे, की मुस्लिम युवक जर कुटुंबासह येत असतील तर त्यांना गरब्यात प्रवेश दिला जाईल.
लोकांसोबत घेतल्या जाताहेत बैठकी
समितीच्या नेत्यांनी सांगितले आहे, की आमचे कार्यकर्ते आयोजकांसोबत चर्चा करीत आहेत. अनेक आयोजकांनी मुस्लिम युवकांना गरब्यात प्रवेश न देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. समितीचे कार्यकर्ते गरब्यांना भेटी देऊन तेथे कुणी मुस्लिम युवक तर नाही ना याची शहानिशा करतील.
आध्यशक्ती गरबा महोत्सवाचे पदाधिकारी पी. बी. बारिया म्हणाले, की लव्ह जिहाद रोखण्यासाठी आम्ही मुस्लिम युवकांना उत्सव स्थळी येऊ देणार नाही. यासाठी आम्ही समितीच्या कार्यकर्त्यांसह खासगी सुरक्षा रक्षक तैनात करणार आहोत.
आध्यशक्तीच्या गरबा अत्यंत लोकप्रिय आहे. यात सुमारे 35 हजार दर्शक सामिल होतात.