आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Person Earn 11 Ruppes A Day Then Not Poor In Gujarat

नरेंद्र मोदींनी उडविली गरीबांची टिंगल, गुजरातमध्ये 11 रुपये कमाई असणारे श्रीमंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - देशात गरीब कोण, यावरुन पुन्हा एकदा वादंग सुरु झाला आहे. मात्र, यावेळी टीकेचे लक्ष्य केंद्र सरकार नसून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे गुजरात सरकार आहे. गुजरात सरकारने आता ग्रामीण भागात 11 रुपये आणि शहरी भागात 17 रुपये रोज कमाई असणा-यांना गरीब मानता येणार नाही असा आदेश काढला आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने काढलेल्या पत्रकानुसार गुजरातमधील ग्रामीण भागात दर महिना 324 रुपये आणि शहरी भागात 501 रुपये कमाई असणारे दारिद्रय रेषेखाली येणार नसल्याचे म्हटले आहे. याआधी योजना आयोगाने शहरी भागात 32 रुपये आणि ग्रामीण भागात 26 रुपये रोजची कमाई असणा-यांना दारिद्रय रेषेखालील मानण्यास नकार दिला होता.
दिग्विजयसिंह यांची टीका
गुजरात सरकारने केलेल्या गरीबीच्या व्याख्येवर काँग्रेस महासचिव दिग्विजयसिंह यांनी निशाणा साधला आहे. मोदींना लक्ष्य करताना दिग्विजयसिंह यांनी ट्विट केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांच्याकडूनही त्यांनी उत्तर मागितले आहे.
अशी केली गुजरात सरकारने गरीबीची व्याख्या
गुजरात सरकारच्या वतीने 16 डिसेंबर 2013 रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला निर्देश देण्यात आले आहे, की राज्यातील शहरी भागात 16.80 रुपये आणि ग्रामीण भागात 10.80 रुपये कमाई असणारे नागरिक हे दारिद्रय रेषेखालील असणार आहेत. त्यांनाच दारिद्रय रेषेचे कार्ड देण्यात यावे.
दारिद्र्य रेषेखाली कुटुंबासाठी गुजरात सरकारने लावलेला निकष अन्यायकारक असल्याची टीका होत आहे. नरेंद्र मोदींच्या भावानेही सरकारने लावलेला निकष चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, जिनके घर शिशे के हो...