नवी दिल्ली/ अहमदाबाद - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचा आज 64 वा वाढदिवस आहे. या निमीत्ताने पंतप्रधान अहमदाबादमध्ये आहेत. त्यांनी सकाळीच त्यांची आई हिराबेन यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. आज मोदी आईची भेट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
हिराबेन सध्या गांधीनगर येथील सेक्टर 22 मधील छोट्या मुलाकडे पंकज मोदी यांच्याकडे राहातात. मोदी सकाळी 7.30 वाजताच तिथे गेले. त्यांनी आईचे चरण स्पर्श केले आणि आईने त्यांना आशीर्वाद दिला. त्यांना पेढा भरवून त्यांचे तोंड गोडे केले. त्यासोबतच त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून पाच हजार रुपये दिले. जम्मू काश्मिरमध्ये आलेल्या जलप्रलयातील पीडितांसाठीच्या पंतप्रधान निधीसाठी त्यांनी ही रक्कम दिल्याचे सांगितले जात आहे. मोदींनी घराच्या अंगणातच आईची भेट घेतली आणि विचारपूस केली. जवळपास 20 मिनीटे ते त्यांच्या कुटुंबियांसोबत होते.
आईची भेट घेतल्यानंतर मोदी माध्यमांशी बोलतील अशी शक्यता होती, मात्र त्यांनी त्यास नकार दिला. मोदींच्या वाढदिवशीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग गुजरात दौर्यावर येत आहेत. आज (बुधवार) दुपारी मोदी जिनपिंग यांची भेट होणार आहे.
जपानच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
जपानचे पंतप्रधान शिंजो ओबे यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा संदेश पाठविला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींच्या वाढदिवसाशी संबंधीत छायाचित्र