आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest News In Marathi Vadodara Still On Edge On 4th Day Of Rioting

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO: बडोद्यात सलग चौथ्या दिवशीही दंगल सुरूच, चाकू हल्ल्यात दोन जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदाः गुजरातची सांस्कृतीक राजधानी असणार्‍या बडोद्यामध्ये सुरू झालेल्या दंगलीचा आज चौथा दिवस आहे. शहरात दोन ठिकाणी चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. येथील चार दरवाजा भागात सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. सतत चालू असलेल्या दंगलीमुळे येथील परिस्थिती गंभीर बनली आहे. दंगलीने रौद्ररूप धारण केल्यामुळे राज्याचे डिजीपी पी. सी. ठाकूर हे शनिवारी शहरात धावत आले होते. आज चौथ्या दिवशीही ही दंगल थांबली नाही. एवढेच नव्हे तर, चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत.
शहरात गुरूवारी जातीय दंगली सुरू झाल्या. कोटियार्कनगर भागात देशी बनावटीचे रॉकेट लॉन्चर सोडण्यात आल्याने लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. रॉकेट लॉन्चर सोडल्यानंतर दंगल करणारे कार्यकर्ते अनियंत्रीत झाले आणि पोलिसांनीही अश्रुधूर सोडले. कलादर्शन आणि चंपानेर दरवाजा भागात आज चाकू हल्ला झाल्याची घटना घ़डली.
पुढील स्लाईडवर पाहा, या दंगलीचे फोटो...