आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद- गुजरात दंगलींप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसआयटीकडून क्लिन चीट योग्य असल्याचे अहमदाबादच्या न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एसआयटीचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्विकारला आहे. मोदींना न्यायालयाने क्लिन चीट दिल्यानंतर झाकीया जाफरी यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. मोदी समर्थकांनी मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर जल्लोष केला. अनेक ठिकाणी समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
गुजरातमध्ये गोध्रातील रेल्वे जाळल्याच्या घटनेनंतर उसळलेल्या दंगलींमध्ये नरेंद्र मोदींच्या भूमिकेची तपासणी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे संचालक आर. के. राघवन यांच्या नेतृत्त्वाखाली या एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने 2011 मध्ये नरेंद्र मोदींना क्लिन चीट दिली होती. मोदींविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याचे समितीने अहवालात म्हटले होते. 2002 मध्ये दंगलीदरम्यान गुलबर्ग सोसायटी हत्याकांड घडले होते. खासदार एहसान जाफरी यांची दंगलखोरांनी हत्या केली होती. एहसान जाफरी यांना गुजरात दंगलीदरम्यान जिवंत जाळून मारण्यात आले होते. या घटनेत 68 जणांचाही जळून मृत्यू झाला होता. जाफरी यांच्या पत्नी झाकीया यांनी याप्रकरणी मोदींवर आरोप केला होता. एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टला त्यांनी आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची याचिका रद्दबातल ठरविली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.