आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Surat Police Disclose Narayan Sai Assets

नारायण साई कोट्यवधींचा मालक; 800 बॅंक अकाउंट,200 कोटींची विदेशी गुंतवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- आसाराम बापू आश्रमातील अल्पवयीन विद्यार्थिंनीवर बलात्‍कार केल्याचा आरोपावरून अटकेत असलेल्या नारायण साईच्या संपत्तीबाबत सुरत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. अहमदाबाद आश्रमातून मिळालेल्या दस्‍तऐवजच्या आधारे नारायण साईकडे सुमारे 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सुरतचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दावा केला आहे.
राकेश अस्थाना म्हणाले, नारायण साईला अटक केल्यानंतर अहमदाबाद येथील आश्रमात छापेमारी करण्यात आली होती. त्यात महत्त्वाचे दस्तऐवेज सापडले होते. त्यानुसार साईची संपत्ती देशातील 10 राज्यांत आहे. साईचे सुमारे 800 बॅंक अकाउंट आणि 200 कोटी रुपये विदेशात गुंतवल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, आश्रमातील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला नारायण साई तब्बल दोन महिने फरार होता. साईचा शोध घेण्यासाठी सुरत पोलिसांनी गुजरातमधील त्याच्या सर्व आश्रमात छापेमारी केली होती.
अहमदाबाद आश्रमातून 42 पोते भरुन दस्तऐवज पोलिसांनी जप्त केले होते. या दस्‍तऐवज तपासले असता त्यात ही माहिती उघड झाली आहे.
पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या; कुठे आणि किती आहे संपत्ती?