आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard Rescued From Farm Well After 2 Hour Operation In Kumbhani Village

खोल विहीरीतील बिबट्याचे ग्रामस्‍थांनी वाचवले प्राण, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदेपूर- तहसीलजवळ असलेल्‍या कुंभाणी गावातील 30 फूट खोल विहीरीत रात्रीच्‍या सुमारास बिबट्या पडल्‍याची घटना बुधवारी घडली. सकाळी बिबट्याची डरकाळी ऐकल्‍यानंतर गावातील नागरिक विहीरीजवळ आले. काय प्रकार आहे हे लक्षात आल्‍यानतरं ग्रामस्‍थांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळाल्‍याबरोबर अॅनीमल वेल्‍फेर ट्रस्‍ट आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्‍थळी पोहचले.
बिबट्याला वाचवण्‍यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्‍यात आले. या ऑपरेशनसाठी कुंभाणी गावातील ग्रामस्‍थांनी वनविभागाच्‍या कर्मचा-यांना मोलाची मदत केली. ग्रामस्‍थांच्‍या मदतीनंतर दोन तासाने बिबट्याला बाहेर काढण्‍यात वनविभागाच्‍या अधिका-यांना यश आले. विहीरीच्‍या बाहेर आल्‍याबरोबर बिबट्याने जंगलाच्‍या दिशेने धाव घेतली.
रेस्क्यू ऑपरेशनची छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाईडवर...