Home »National »Gujarat» Bullettrain LIVE Narendra Modi And Shinzo Abe Road Show In Ahmedabad

शिंजो अॅबेंनी 30 मिनिटांच्या रोड शोनंतर साबरमती आश्रमात महात्मा गांधींना केले नमन

दिव्य मराठी वेब टीम | Sep 14, 2017, 12:03 PM IST

अहमदाबाद- जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे दोन दिवसांच्या दौऱ्यावर बुधवारी अहमदाबादला पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. विमानातून अॅबे बाहेर येताच मोदींनी त्यांची गळाभेट घेतली. तीन वर्षांत या दोन नेत्यांची झालेली ही ११वी भेट. यानंतर खुल्या जीपमध्ये नेत्यांनी रोड शो केला. भारतीय पंतप्रधानांनी अन्य देशाच्या पंतप्रधानांसोबत रोड शो करण्याची ही पहिलीच वेळ. ८ किमी रोड शोनंतर दोन्ही नेते साबरमती आश्रमात पोहोचले.
प्रथमच एखाद्या विदेशी पंतप्रधानांसोबत मोदींचा रोड शो
- अॅबे यांच्या भारत दौऱ्याच्या एक दिवस आधी मोदींनी ट्विट केले होते, 'पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या स्वागतासाठी उत्सूक आहे.'
- गांधीनगरच्या साबरमती आश्रमापर्यंत ते 8 किलोमीटरचा रोड शो करणार आहेत.
- संध्याकाळी दोन्ही देशांचे नेते अहमदाबादमधील प्रसिद्ध सिदी सय्यद मशिदीत जातील. येथे सूर्यास्तावेळी फोटो शूट होईल.
मेक इन इंडिया : संरक्षण सामग्री बनवणाऱ्या कंपन्या येतील भारतात
इंडाेनेशियात बुलेट ट्रेन चालवण्यात जपानला चीनकडून पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत अॅबे शिंकासेन बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान निर्यात करण्याची तयारी करत अाहेत. जपानसमाेर भारताचा चांगला पर्याय अाहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात बुलेट ट्रेन चालवण्याची माेठी घाेषणा हाेऊ शकते. दाेन्ही पंतप्रधान इतरही अनेक प्रकल्प सुरू करतील. जपानसाेबत सैन्य सहकार्य वाढवण्यासह भारतास शस्त्रास्त्रे अन्य सामग्रीच्या स्थानिक निर्मितीवर भर देण्यासाठी संरक्षण तंत्रज्ञान प्राप्त करण्यात मदत मिळण्याची शक्यता अाहे. त्यातून संरक्षण सामग्री बनवणाऱ्या जपानी कंपन्यांशी भारतात लढाऊ विमाने पाणबुड्या बनवण्याच्या प्रकल्पांवर चर्चा सुरू अाहे.
घेराबंदी : अाफ्रिकी काॅरिडाॅरद्वारे चीनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न
भारताने चीनच्या ‘वन बेल्ट-वन राेड’ (अाेबीअाेअार) प्रकल्पापासून स्वत:ला दूर ठेवले अाहे. या प्रकल्पाच्या प्रत्युत्तरादाखल भारताने अाफ्रिकी विकास बँकेच्या बैठकीत अाशिया-अाफ्रिका ग्राेथ काॅरिडाॅरचा शुभारंभ केला हाेता. हा माेदी अॅबे यांचा ड्रीम प्राेजेक्ट अाहे. या दाैऱ्यात अॅबे या प्रकल्पाशी निगडित अनेक करार करू शकतात. या माध्यमातून भारत जपान हे दाेन्ही देश अाशिया अाफ्रिकन देशांमध्ये क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करू इच्छित अाहेत. या प्रकल्पांतर्गत भारत जपान साेबत राहून अाफ्रिका, इराण, श्रीलंका दक्षिण-पूर्व अाशियात अनेक पायाभूत प्रकल्पांवर काम करत अाहेत.
हे ही वाचा...

Next Article

Recommended