वडताल - विश्वप्रसिद्ध श्री स्वामीनारायण मंदिरात सुरु असलेल्या सद्गुरु स्मृती मोहत्सव दरम्यान वडताल पिठाधीपती प.पु.ध.धू 1008 आचार्य श्री राकेशप्रसादजी महाराज आणि संप्रदायातील वरिष्ठ संतांच्या हस्ते मंदिरातील सोन्याच्या 6 दरवाजांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंदिराचा परिसर मोठ्या संख्यने उपस्थित असलेल्या संत आणि भक्ताच्या श्रद्धेने आणि स्वामीनारायण यांच्या जयघोषाने प्रफुल्लीत झाला होता.
मागील दोन महिन्यांपासून वडताल स्थित स्वामीनारायण मंदिराचे 200 वर्ष जुन्या विराटकय दरवाजांना सोन्याने मढवण्याचे काम सुरु होते. या दरवाजांना सोन्याने मढवण्यासाठी 8 किलो सोने आणि 80 किलो चांदीचा उपयोग करण्यात आला आहे. श्री स्वामीनारायण गुरुकुल भूमेल परिवार आणि वडताल मंदिराच्या योगदानाने 6 सुवर्ण द्वार तयार करण्यात आले आहेत.
या सोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...