आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Couple Commits Suicide By Jumping In Lake In Gujarat

PHOTOS: प्रेमीयुगुलाने बाईकसह तलावात मारली उडी, तरुणी होती विवाहित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंडल (गुजरात)- प्रेमीयुगुल बाईकवरुन तलावाच्या शेजारुन जात होते. यावेळी बाईक चालवत असलेल्या तरुणाने बाईकची दिशा तलावाकडे वळवली. आवेगात अॅक्सिलेटर पिळले. आणि बघता बघता बाईकसह दोघे तलावात जाऊन पडले. दोघांनी आत्महत्या केली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
कल्पेश राठोड (वय 23) आणि पायल (वय 22) असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. दुपारच्या सुमारास दोघे वेरी तलावाजवळ बाईकवर आले. त्यानंतर दोघांनी घाटावर बाईक नेली. तेव्हा दोघेही बाईकवरच स्वार होते. त्यानंतर तलावाच्या दिशेने बाईक वळवली. प्रचंड वेग गाठक घाटावरुन बाईकसह तलावात उडी मारली. काही लोकांनी ही घटना बघितली. घटनेनंतर लोकांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पायल होती विवाहित
पायलचे लग्न झाले आहे. तिने पतीपासून घटस्फोट घेतला आहे. तिला दोन वर्षांची एक मुलगी आहे. कल्पेश अविवाहित आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. गेल्या सात-आठ दिवसांपासून दोघे बेपत्ता होते. दोघांच्या लग्नाला कुटुंबीयांना विरोध केला होता.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो...