आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह जिहाद : 'मुस्लिम तरुण माझ्या मुलीला देह व्यापाराच्या दलदलीत ढकलेल'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथितरित्या पळवून नेण्यात आलेल्या मुलीची आई दिव्य भास्कर डॉट कॉमसोबत बातचीत करताना. इन्सेट पळवून नेलेली युवती. - Divya Marathi
कथितरित्या पळवून नेण्यात आलेल्या मुलीची आई दिव्य भास्कर डॉट कॉमसोबत बातचीत करताना. इन्सेट पळवून नेलेली युवती.
राजकोट (गुजरात) - मुस्लिम तरुणाने एका हिंदू युवतीला पळवून नेण्याच्या प्रकरणाने आता गंभीर रुप घेतले आहे. स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आरोपीला लवकरात-लवकर पकडून त्याच्या ताब्यातील युवतीला आई-वडिलांच्या हवाली करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

युवतीच्या आई-वडिलांनी 'दिव्य भास्कर डॉट कॉम'सोबत बातचीत करताना सांगितले, की मुलीला पळवून नेणारा रफीक देह व्यापाराचा धंदा करतो. तो आमच्या मुलीला या दलदलीत ढकलणार आहे.

काय आहे प्रकरण
राजकोटमधील कुवाडवा रोडवरील चित्रकुट सोसायटीत राहाणाऱ्या दिनेशभाई आमि त्यांची पत्नी शारदाबेन यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. दिनेशभाईंनी सांगितले, की रफीकने त्यांच्या मुलीला धमकावून पळवून नेले आहे. कारण सात दिवस झाले तरी मुलीचा अद्याप फोन आलेला नाही. त्यांचे म्हणणे आहे, की जर मुलगी स्वतःच्या मर्जीने पळून गेली असती तर लग्नानंतर आई-वडिलांना एकदातरी कळविले असते. पण एक आठवड्यानंतरही मुलीने संपर्क केलेला नाही.

शिवसेनेचे राजकोट शहर प्रमुख जिम्मी अडवाणी यांनीही पोलिस आयुक्तांची भेट घेऊन रफीकच्या तावडीतून मुलीची तातडीने सुटका करण्याची मागणी केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधीत फोटो
बातम्या आणखी आहेत...