आनंद (गुजरात)- काय आपण महात्मा गांधींची मुलाखत घेऊ इच्छिता? मी आपल्याला सांगु इच्छितो की हा जगातील सर्वात अवघड विषयांपैकी एक आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्टरने त्यांचे सचिव मोहनदेव यांना मुलाखतीविषयी विचारले असता त्या पत्रकाराला हे उत्तर मिळाले. खूपच प्रयत्न केल्यानंतर 30 एप्रिल 1931 रोजी गांधीजी मुलाखतीसाठी तयार झाले.
जेव्हा गांधीजी म्हणाले, स्वातंत्र्यासाठी जीव देण्यासही तयार
- 3 मिनिटाच्या मुलाखतीदरम्यान पत्रकाराने गांधीजींना विचारले भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही जीव देण्यास तयार आहात का? त्यावेळी गांधीजी हसले. त्यांनी जे उत्तर दिले त्याचा अंदाज पत्रकाराला आलेला नव्हता.
- हे तेच वर्ष आहे ज्यावर्षी गांधींजींनी पूर्ण स्वातंत्र्याचा नारा दिला होता. मिठाच्या सत्यागृहासाठी दांडी मार्च काढला होता. इंग्रजांचा अहिंसात्मक पध्दतीने खुल्या पध्दतीने विरोध सुरु केला. त्यामुळे पूर्ण स्वराज्याच्या मोहिमेस गती मिळाली. गांधीजींचे स्वराज्य आंदोलन म्हणजे ब्रिटिशांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, कायदेशीर, शैक्षणिक संस्थाचा विरोध करण्याचे आंदोलन होते.
- गांधीजी हे लाजाळू स्वभावाचे म्हणून ओळखले जात. ते मुलाखतींपासून दुर राहणेच पसंत करत. त्याचवेळी त्यांनी ही मुलाखत दिल्याने ही मुलाखतही त्यांच्या पूर्ण स्वराज्याचाच भाग असल्याचे म्हटले जाते.