आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'माय सेक्स लाइफ\' मध्ये महात्मा गांधींनी जेव्हा ब्रह्मचर्यबद्दल सांगितले, वाचा संपूर्ण लेख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून इंग्रजांना भारत सोडायला लावणाऱ्या महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. महात्मा गांधी यांचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात विखुरले आहेत. त्यांच्यासंदर्भात एखादी बातमी असली तर ती जगभरातील तेव्हाच्या वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे छापली जायची. यावरुन त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.
न्युयॉर्क येथील लिबर्टी मॅगझिनमध्ये 4 मे 1940 रोजी महात्मा गांधी यांनी 'माय सेक्स लाइफ बाय गांधी' अशा मथळ्याचा लेख लिहिला होता. यात त्यांनी त्यांची सेक्स लाईफ आणि ब्रह्मचर्य यावर खुलून चर्चा केली होती.
यात ते म्हणाले होते, की 1906 मध्येच मी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली होती. यामुळे मी देशाची अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करु शकतो, असे मला वाटते. ब्रह्मचर्यानंतर माझे जीवन आणखी खुले आणि स्वतंत्र झाले. ब्रह्मचर्याने मला खरेखुरे स्वातंत्र्य दिले. यापूर्वी मला कधी समृद्धी आणि परिपूर्णचेचा आभास झाला नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, तेव्हाच्या वृत्तपत्रांमध्ये महात्मा गांधी यांच्या बातम्या कशा येत होत्या...