आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत गांधी GIRLS: गांधीजींच्या कुटुंबात मुलांपेक्षा मुली जास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - महात्मा गांधी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले होते. त्यानिमीत्ताने 'प्रवासी भारतीय दिवस' साजरा केला जातो. भारत सरकार हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करते. 2015 मध्ये या कार्यक्रमाचे यजमानपद महात्मा गांधींची जन्मभूमी असलेल्या गुजरातला मिळाले आहे. गांधीनगरमध्ये हा सोहळा होत आहे. सध्या देशाचे पंतप्रधानही गुजराती आहेत. असे असतानाही सरकारला या दिवशी गांधींच्या कुटुंबियांचा विसर पडला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण महात्मा गांधींच्या वंशजांना देण्यात आलेले नाही.
महात्मा गांधींबद्दल आपण शाळकरी वयापासून काही ना काही वाचत आलेलो आहोत. सर्वांनाच गांधीजींबद्दल थोडीफार माहिती असते. मात्र त्यांच्या परिवाराबद्दल अनेकांना माहित नाही. 'प्रवासी भारतीय दिवसा'निमीत्त आज आम्ही तुम्हाला गांधीजींच्या कुटुंबियांच्या सध्याच्या स्थिती बद्दल सांगणार आहोत. गांधींजींचे 154 वंशज आज जगातील सहा देशांमध्ये राहात आहेत. यात त्यांचे नातू आणि नात व त्यांच्या मुलांचा समावेश आहे. हे सर्व उच्च विद्याविभूषीत प्राध्यापक, पत्रकार ते शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
यातील 12 डॉक्टर, 12 प्राध्यापक, 5 इंजिनिअर, 4 वकील, 3 पत्रकार, 2 आयएएस, 1 शास्त्रज्ञ, 1 चार्टड अकाऊंटंट, 5 खासगी कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आणि 4 पीएचडी धारक आहेत. त्यांच्या कुटुंबात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. हे सर्व लोक भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे राहातात. विशेष म्हणजे महात्मा गांधींना मुलगी नव्हती, याचे त्यांना कायम शल्य होते. मात्र सध्याच्या स्थितीत त्यांच्या वंशजांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, गांधीजींची मुले आणि कुटुंबियांविषयी