आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahatma Gandhi Grandson Knubhai Living In Alms House With Wife

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महात्मा गांधींचे नातु आणि नातसुनेवर सुरतमधील वृद्धाश्रमात राहण्याची वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- देशाला स्वातंत्र मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू आणि नातसुनेवर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. गांधींचे 84 वर्षीय नातू कनुभाई गांधी यांच्यासह त्यांची पत्नी शिवालक्ष्मीवर सुरतमधील एका वृद्धाश्रमात गेल्या महिन्यापासून राहात आहेत. गांधींचे अन्य नातुंची आज चांगली परिस्थिती आहे. ते चांगले आयुष्य जगत असताना कनुभाई आणि शिवालक्ष्मी यांच्या वाट्याला मात्र आयुष्याच्या संध्याकाळी हालाखीचे जीवन आले आहे.

गांधींचा त‍िसरा मुलगा रामदासभाई यांना तीन मुले आहेत. कनुभाई हे रामदासभाई यांचे सगळ्यात धाकटे चिरंजिव आहे. कनुभाई हे 84 वर्षांचे आहेत. महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा कनुभाई हे 17 वर्षांचे होते. स्वातंत्र लढ्यात कनुभाई देखील गांधीं यांच्या सोबत जात होते.

कनुभाई हे 40 वर्षे अमेरिकेत राहिले. काही महिन्यापूर्वी ते भारतात आले. दिल्ली, बंगळुरु आणि नवसारी येथे काही दिवस रा‍हिले. नवसारीमधील मरोली येथील कस्तुरबा सेवाश्रमात दोघे राहात होते. मात्र, तेथील एका सेवकाने कनुभाई यांची एक लाख 64 हजार रुपयांची फसवणूक केली. नंतर कनुभाई आपल्या पत्नीसह सुरतमधील श्री भारती मैया आनंदधाम वृद्धाश्रमात राहात आहेत.
'मागील एक महिन्यापासून महात्मा गांधी यांचे नातू कनुभाई आणि पत्नी शिवालक्ष्मी आमच्या आश्रम वास्तव्य करत आहे. कनुभाई आमच्या आश्रमात राहत असल्याचा आनंद असल्याचे श्री भारती मैया आनंदधाम वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीपभाई सोलंकी यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कनुभाई यांची व्यथा...

(फाइल फोटो: कनुभाई गांधी)