आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या आश्रमाला वालीच मिळेना!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशात स्थापन केलेल्या आश्रमांपैकी एक कोचरबमध्ये गांधीजींच्या जीवनशैलीची अनुभूती घेण्याची योजना 4 महिन्यांपूर्वी सुरू झाली खरी, मात्र त्यास एकाही पर्यटकाने अद्याप प्रतिसाद दिला नाही.

‘काही काळ गांधी जीवनशैली जगा’ ही योजना ट्रॅव्हल एजंट निश्चल बारोट यांनी येथील आश्रमात 2 ऑक्टोबरपासून सुरू केली. या योजनेस पर्यटकांनी अद्याप प्रतिसाद दिला नाही. मात्र, स्थानिक नागरिकांसह ब्राझील, ब्रिटन, अमेरिका, श्रीलंका आदी देशांतून शंभरवर पर्यटकांनी त्यासंबंधी विचारणा केल्याचे सांगण्यात येते. आश्रमात येणार्‍या लोकांनी पाच दिवस साध्या पद्धतीने राहणे अपेक्षित आहे. सत्य, अहिंसेच्या नीतिमूल्यांसह त्यांना खादी कपड्यात राहावे लागेल. याबरोबर येथे आलेल्या लोकांना स्वत:ची कामेही करावी लागणार आहेत. विविध ठिकाणांहून टेलिफोन आणि ऑनलाइन विचारणा करण्यात आली आहे. मे महिन्यात बुकिंग मिळणे अपेक्षित आहे. सध्याच्या ‘डेस्टिनेशन’ आधारित पर्यटनातून व्यावसायिक उद्देश साध्य केला जातो. आर्शमाचे पर्यटन त्यास अपवाद आहे, असे बारोट म्हणाले.

महात्मा गांधींनी परदेशी समुदायाला जोडले
परदेशात जाणारे महात्मा गांधी भारताचे पहिले जबाबदार व्यक्ती होते. त्यांनी दुसर्‍या समाजाला जोडण्यात योगदान दिले तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत केली. हे सर्व करत असताना तेथील पर्यावरणावर किमान परिणाम झाल्याचे बारोट यांनी स्पष्ट केले. गांधीजींची जीवनशैली अंगीकारण्याच्या योजनेतून शाश्वत जीवनशैलीचे विविध प्रकार आणि महात्माजींच्या शिकवणीचा अनुभव मिळवून देण्याचा उद्देश असल्याचे बारोट यांनी सांगितले. या पर्यटनासाठी राज्य सरकारकडे प्रोत्साहन देण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.