आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश शहा प्रकटले; म्‍हणतात 13860 कोटी तर नेते, अधिकारी, व्यापाऱ्यांचेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - १३,८६० कोटींचा काळा पैसा जाहीर करणारे व्यापारी महेश शहा शनिवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या एका वृत्तवाहिनीवर प्रकटले. जवळपास दोन तास ते वाहिनीवर मुलाखत देत होते. दरम्यान, प्राप्तिकर अधिकारी आणि पोलिस वाहिनीच्या कार्यालयात दाखल झाले आणि ७.४० वाजता त्यांनी शहा यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, आपण जो काळा पैसा जाहीर केला आहे तो नेते, अधिकारी आणि अन्य व्यापाऱ्यांचा असल्याचा दावा शहा यांनी केला. २ % कमिशनसाठी हे काम केल्याचे शहा म्हणाले. मग हा पैसा नेमका कुणाचा, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही. हा पैसा किती लोकांचा आहे, ते कुठे राहतात हे पण सांगितले नाही. मीडियाला काही सांगण्यापूर्वी आपण निवडक प्राप्तिकर अधिकाऱ्यांसमोर माहिती देऊ, असेही त्यांनी सांगितले. ‘माझ्यासोबत जे होते ते आता उलटले आणि मी एकटा बदनाम झालो. माझ्या कुटुंबाला या लोकांपासून धोका आहे,’ असेही शहा यांनी म्हटले आहे.

२% कमिशनसाठी हे काम केले, शहा यांचा युक्तिवाद : समजा तुमच्याकडे १०० रुपये काळा पैसा आहे. त्यातील ५० रुपये देऊन ते चालवा, २ टक्के कमिशन देतो, असे कुणी म्हणाले तर तुम्ही हेच कराल ना...
२% दराने १३,८६० कोटी काळा पैसा पांढरा करण्यासाठी शहा यांना २७० कोटी मिळाले असते.

नाइलाज होतो म्हणून घोडचूक केली, आता भंडाफोड करेन...
तुमची चूक झाली असे वाटते? ५ दिवस का लपलात?
हो चूक झाली. मी पळपुटा नाही. रिअल इस्टेटचे काम करतो. मीडिया माझ्या कुटुंबावर तुटून पडला म्हणून आलो...

कुटुंबीय काहीच सांगत नव्हते...
मुलगा किंवा कुटुंबाला माझ्या व्यवसायाबद्दल काहीच माहिती नाही. माझ्या जोखमीवर मी हे केले.

१५६० कोटी का नाही भरले?
कर भरणारच होतो, पण ऐनवेळी माझ्याच लोकांनी साथ सोडली.

या लोकांची नावे सांगाल?
सगळे सांगेन, परंतु फक्त प्राप्तिकर अधिकाऱ्यांनाच...

घोषित रक्कम तुमची होती?
ही रक्कम माझी नाही. दुसऱ्याची आहे. कुणाची ते अधिकाऱ्यांना सांगेनच.

ते लोक तुमचे मित्र आहेत?
सगळे विश्वासूच. परंतु त्यांनी विश्वासघात केल्याने ही स्थिती निर्माण झाली. मी चूक केली. हे सगळे लोक भारतीयच आहेत.
चूक झाली खरे, पण असे केले कशामुळे?
माझा नाइलाज होता...

आताच या लोकांची नावे का सांगत नाहीत?
मीडियाला कळेल म्हणून... थोडी वाट पाहा. सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शहाच्या फ्लॅटचे प्रवेशद्वार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...