आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahmood Madni Travels In Special Bullet Proof Car Of Narendra Modi

मोदींच्‍या बुलेटप्रुफ गाडीत फिरले स्‍तुती करणारे मदनी, गुजरात सरकारकडून बडदास्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांची स्‍तुती करणारे जमात-ए-उलेमा हिंदचे सरचिटणीस महमूद ए मदनी यांना गुजरात सरकारने राज्‍य अतिथीच्‍या दर्जाप्रमाणे सुरक्षा व्‍यवस्‍था पुरविली. त्‍यांची खास बडदास्‍त ठेवण्‍यात आली होती. मदनी यांनी नरेंद्र मोदींच्‍या बुलेट प्रुफ गाडीत प्रवास केला. ही गाडी मोदींच्‍या ताफ्यात राखीव म्‍हणून ठेवण्‍यात येते.

मदनी यांना झेड प्‍लस सुरक्षा देण्‍यात आली आहे. ते गुरुवातरी एका कामानि‍मित्त अहमदाबादला गेले होते. अहमदाबाद विमानतळापासून खादी ग्रामोद्योग भवनपर्यंत त्‍यांच्‍यासाठी मोदींच्‍या ताफ्यातील खास बुलेट प्रुफ गाडी देण्‍यात आली होती. गुजरात सरकारने मदनी यांच्‍यासाठी चांगलीच बडदास्‍त ठेवली होती. एखाद्या राज्‍य अतिथीप्रमाणे त्‍यांना सोयी पुरविण्‍यात आल्‍या होत्‍या.

सर्वसाधारणपणे मदनींसाठी ही गाडी मिळाली नसती. गुजरात सरकारकडून राज्‍य अतिथीचा दर्जा मिळाल्‍यानंतरच हे शक्‍य होते. वाहन आणि सुरक्षेची जबाबदारी राज्‍य सरकारची असते. त्‍यामुळे शक्‍य तेवढ्या चांगल्‍या सोयी देण्‍याचा प्रयत्‍न राज्‍य सरकारचा असतो.

मदनी यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्‍ये मोदींची स्‍तुती केली होती. मुस्लिम जनता मोदींना स्विकारत असल्‍याचे मदनी म्‍हणाले होते. गुजरात दंगलींप्रकरणी आता तर मोदींना क्लिन चीटही मिळाली आहे.