आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallika Sarabhai Attacks On Pm Modi Death Of Mrinalini Sarabhai

मल्लिकांची पंतप्रधान मोदींवर टीका, ...तुम्हाला लाज वाटली पाहिजे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नृत्यांगणा मृणालिनी यांना त्यांची कन्या मल्लिकाने नृत्यांजली अर्पण केली. - Divya Marathi
नृत्यांगणा मृणालिनी यांना त्यांची कन्या मल्लिकाने नृत्यांजली अर्पण केली.
गांधीनगर (गुजरात) - नृत्यांगना मल्लिका साराभाई यांनी त्यांची आई मृणालिनी साराभाई यांच्या निधनानंतर काही तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंबंधी सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टने वादाला तोंड फोडले आहे. फेसबुक आणि ट्विटर युजर्स त्यांच्या या पोस्टवर टीका करत आहेत.

काय लिहिले मल्लिका यांनी
- मृणालिनी साराभाई यांच्या निधनानंतर मोदींनी श्रद्धांजली वाहिली नाही, अशी खंत मल्लिका यांनी पोस्टमधून व्यक्त केली होती.
- त्यांनी लिहिले, 'माझे प्रिय पंतप्रधान. तुम्हाला माझे राजकारण आणि मला तुमचे राजकारण आवडत नाही. तुम्हाला असे वाटत नाही का, की मृणालिनी साराभाईंनी 60 वर्षे आपल्या देशाच्या कलेला दिले, त्यांनी आपली कला जगभर पोहोचवली, एवढेच नाही तर तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र तिच्या निधनानंतर तुम्ही चकार शब्दानेही काही बोलला नाहीत. हे तुमची मानसिकता दाखवणारे आहे. तुम्ही माझा कितीही राग करत असले, तरी एक पंतप्रधान म्हणून तुम्ही देशातील कलावंताला सन्मान दिला पाहिजे होता. जे की तुम्ही केले नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.'
नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे गुरुवारी अहमदाबादेत निधन झाले. 'अम्मा' नावाने प्रसिद्ध मृणालिनी या अंतराळ वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या पत्नी होत्या. त्यांचे जगभरात 18 हजार शिष्य आहेत. त्यांनी 300 पेक्षा जास्त नृत्य-नाट्यात नृत्यदिग्दर्शन केले.
- सोशल मीडियावर होत आहे टीका
- 1. Rahul:
Shows Mallika Sarabhai's mentality! Using her mother's death to target @narendramodi
2. Kamal Modi:
@narendramodi It sums up the mentality of ALs they see NAMO angle even at the time of death of their near ones.
3. Gaurav Pandhi
Mallika Sarabhai's message to @narendramodi over demise of her mother Mrinalini Sarabhai. Such sad state of affairs.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मल्लिका यांचे ट्विट