अहमदाबाद - गुजरात उच्च न्यायालयात सोमवारी पेटलेल्या अवस्थेत एक व्यक्ती सुरक्षा कडे तोडून कोर्टरूममध्ये घुसली. आत्मदहन करणारी ही व्यक्ती सुरत येथील किशोर अग्रवाल असून तिच्यावर फसवणुकीच्या आरोपावरून खटला सुरू आहे.
सूत्रांनी सांगितले की सोमवारी आरोपी किशोर अग्रवाल ज्वालाग्राही पदार्थ घेऊन बराच काळ गुजरात उच्च न्यायालयाच्या परिसरात फिरत होता. दुपारी अडीचच्या सुमारास त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना घडली त्या वेळी मुख्य न्यायाधीश व सहन्यायाधीश व्ही. एम. पांचोली उपस्थित होते. अग्रवालने ज्वालाग्राही पदार्थ अंगावर शिंपडून पेटलेल्या अवस्थेत कोर्टरूमच्या दिशेने धाव घेतली. बाहेरच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने सुरक्षा रक्षकांना धक्का दिला. त्याचा शर्ट पूर्ण पेटला होता. कुणीतरी त्याचा शर्ट खेचून काढला. आत्मदहनाचा हा प्रकार पाहून न्यायाधीश प्रोटोकॉलनुसार त्यांच्या चेंबरमध्ये निघून गेले.
नंतर त्याला अॅम्ब्युलन्समधून पोलिसांनी सरकारी रुग्णालयात दाखल केले. फसवणुकीचा आरोप असलेल्या किशोर अग्रवालने फसवणूक झालेल्या सुमारे शंभर ते दीडशे महिलांना पैसे देतो, असे सांगून फोन करून कोर्टाच्या आवारात बोलावून घेतले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संपूर्ण प्रकाराचे ग्राफिक्स आणि फोटो...