आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती इराणींवर संतप्त शेतकऱ्याने फेकल्या बांगड्या; मंत्री म्हणाल्या हा काँग्रेसचा डाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी स्मृती इराणी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. - Divya Marathi
मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी स्मृती इराणी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
अहमदाबाद- मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी अमरेलीत पोहचलेल्या स्मृती इराणींना रॅली दरम्यान सोमवारी शेतकऱ्याच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्या लोकांना संबोधित करत असतानाच एक शेतकरी उभा राहिला आणि त्याने इराणी यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या. या व्यक्तीला पकडून नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. इराणी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, गुजरातमध्ये पुढील वर्षी निवडणूका आहेत. त्यामुळे अशा घटना घडणे अपेक्षितच आहे. एका महिलेवर हल्ला करण्यासाठी काँग्रेसने एका व्यक्तीला पाठवले. ही स्टॅटर्जी चुकीची आहे.

काँग्रेस आमदाराने केला विरोध

- बांगडा फेकणारी व्यक्ती एक शेतकरी असल्याचे सांगितले जाते. त्याचे नाव केतन कासवाला असे आहे. 
- शेतकऱ्याला सोडण्यासाठी काँग्रेसचे आमदार परेश धनानी यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. त्यानंतर त्यांच्या समवेत 15 जणांना ताब्यात घेण्यात आले.
- स्मृती इराणी यांनी पोलिसांना सांगितले की, या बांगड्या एकत्र करुन त्याच्या पत्नीला भेट देऊन टाकू या. स्मृती यांच्या आदेशानंतर केतन सोडण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...