राजकोट - कालावड रोडवर रविवारी दुपारी 4.50 वाजता काठी समाजाच्या एका तरूणाची त्याच्या मावस भावाने गोळ्या घालून हत्या केली. हत्येच्या पहिले मृत तरूण शक्तीसिंह खुमाण आणि बोटादच्या तुरखा गावातील रहिवाशी असलेला मावस भाऊ तेजस विशाल खाचर यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर दोघांनी मिळून कॉफीही घेणार होते. मात्र जेव्हा शक्तीसिंह कॉफी बनवत होता तेव्हा तेजसने अचानक त्याच्यावर गोळीबार केला. शक्तिसिंह जमीनीवर कोसळताच तेजस फरार झाला.
या घटनेनंतर तेजसच्या नावाचा खुलासा झाल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी पोलिस मध्यरात्री बोटादला रवाना झाले. गोळ्या लागल्याने शक्तिसिंह याची तब्येत काल मध्यरात्रीपर्यंत गंभीर होती, मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. शक्तिसिंहचा छोटा भाऊ रघुवीर सिंह खुमाण यांनी फिर्यादाच्या आधारावर पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. आरोपी तेजस बोटादमध्ये फुड झोन नावाच्या रेस्टॉरंटचा मालक आहे. काही दिवसांपूर्वी तेजस जेलमधून बाहेर आला होता. तेजस खुनाच्या प्रयत्न केल्याबद्दल अटकेत होता.