आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या टाकीत पडला, 50 फूट वाहात गेला, पाईप कापून काढला मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हारिज (गुजरात) - गुजरातमधील हारिज येथे शुक्रवारी एका पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत राजू प्रताप किहोरी आणि त्याचा सहकारी धर्मेश सुरमभाई किहोरी ओव्हरहेड टाकीची टेस्टींग करण्यासाठी गेले होते. राजू दोरखंडाच्या सहाय्याने टाकीत उतरला, पाण्याचा प्रवाह पाहाण्यासाठी त्याने व्हॉल्व उघडला आणि वेगाने पाणी वाहू लागले. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की दोरखंड तुटला आणि राजू 300 मिमी रुंद पाईपमध्ये वाहात गेला आणि 50 फुटांवर खाली एका व्हॉल्व चेंबरमध्ये येऊन अडकला.
धर्मेशने सांगितले, की तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गॅस कटरच्या सहाय्याने पाईप कापून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. महापालिकेने 3.50 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. शुक्रवारी त्यात 1.50 लाख लिटर पाणी भरले होते. त्यामुळे पाण्याचा दबाव जास्त होता. या पाण्याच्या टाकीचे लवकरच लोकार्पण होणार होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्रे