आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौराणिक समुद्रमंथनाचा मंदार पर्वत गुजरातमध्ये आढळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - दक्षिण गुजरातच्या सागरी तळाला पौराणिक काळात समुद्रमंथनासाठी वापरण्यात आलेल्या ऐतिहासिक पर्वताचे अवशेष सापडले आहेत. शास्त्रज्ञांनी केलेल्या कार्बन चाचणीतही त्याला दुजोरा मिळाला आहे. पिंजरता गावाजवळ समुद्रात मिळालेला हा पर्वत बिहारमधील भागलपूरमध्ये असलेल्या मंदार डोंगरासारखा आहे. गुजरात व बिहारमधील या पर्वतांमध्ये कमालीचे साम्य असून या दोन्ही पर्वतांवर विपुल प्रमाणात ग्रॅनाइट आढळून आले आहे.

सुरतचे पुरातत्त्ववेत्ता मितुल त्रिवेदी यांनी सांगितले की, आम्हाला कार्बन चाचण्यांमधून यासंदर्भात ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यातूनही या पौराणिक पर्वताचे दाखले मिळतात. त्यानुसार हा पर्वत समुद्रमंथनावेळीचाच असल्याचे स्पष्ट होते. त्रिवेदी यांनी त्यांच्या ओशनोलॉजी या आपल्या वेबसाइटवर याची पुष्टी करताना सविस्तर तपशील दिलेला आहे. ओशनोलॉजी विभागाने वेबसाइटवर सुमारे 50 मिनिटांचा एक व्हिडिओ जारी केला आहे.

यात समुद्रात द्वारकानगरीचे अवशेष मिळाल्याचीही सविस्तर माहिती दिली आहे. वेबसाइटवर अँन्शियंट द्वारकाचा आलेखही देण्यात आलेला आहे. त्यासोबतच समुद्रमंथनातील पर्वताच्या तथ्यांची पुष्टी करण्यात आली आहे.