आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : काँग्रेसचा जाहीरनामा, पेट्रोल-डीझेल 10 रुपयांनी तर वीज 50% स्वस्त करण्याचे आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला पाच दिवस शिल्लक असताना काँग्रेसने सोमवारी जाहीरनामा जारी केला. काँग्रेसने 'खुश रहे गुजरात, खुशहाल गुजरात" थीमवर हा जाहीरनामा सादर करण्यात आला आहे. यात काँग्रेसने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबतचे आश्वासनही दिले आहे. तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे 5 वर्षांत राज्यात राज्यांत 25 लाखांपेक्षा जास्त घरे बनवण्यावरही जाहीरनाम्यात जोर देण्यात आला आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. भाजपने मात्र अद्याप जाहीरनामा सादर केलेला नाही. 


काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील 9 मोठी आश्वासने 
1) 25 लाख तरुणांना रोजगार 
2) पेट्रोल-डीझेल स्वस्त करणार. 10 रुपयांपर्यंत कपात केली जाणार. 
3) शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार. 
4) हेल्थ कॉर्ड देणार. त्याद्वारे मोफत औषधी पुरवली जाणार. 
5) वीजेच्या दरामध्ये 50% कपात केली जाणार. 
6) 16 तास वीज देण्याचे आश्वासन. 
7) 5 वर्षांमध्ये 25 लाख घरे बांधणार. 
8) वीज चोरीचे गुन्हे मागे घेतले जाणार. 
9) पाटीदारांसाठी स्पेशल कॅटेगरी तयार करणार. 

बातम्या आणखी आहेत...