आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : मद्यधुंद युवतीचा पोलिस ठाण्‍यात राडा, अधिकाऱ्यांना शिविगाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वापी (गुजरात) - येथील बगवाडा टोलनाक्‍यावर दारूच्‍या नशेत एका तरुणीने राडा केला. एवढेच नाही तर आपले आपहरण झाले असल्‍याची माहिती तिनेच पोलिसांना दिली. त्‍या नंतर तिने पोलिस ठाण्‍यात गोंधळ घालत पोलिसांना अश्‍लील शिव्‍या दिल्‍या.
नेमके काय झाले...
सूरतच्‍या रांदेरमध्‍ये राहणारी एक 19 वर्षीय युवती बुधवारी आपल्‍या एका महिलेसोबत स्वीफ्ट कारमधून दमन येथे गेली होती. गुरुवारी सायंकाळी ही कार महामार्गाकडे येत होती. एवढ्यात युवती कारमधून बाहेर पडली. रस्‍त्‍यावर येऊन तिने एका आयशर टेम्पोवाल्‍याला लिफ्ट मागितली. एवढेच नाही तर आपले हपहरण झाल्‍याचे तिने टेम्‍पो चालकाला सांगितले. त्‍यामुळे चालकाने या बाबत तत्‍काळ 100 नंबरवर माहिती दिली.
पारडी पोलिस ठाण्‍यात घातला गोंधळ
पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळताच पारडी पोलिस ठाण्‍याचे कर्मचारी बगवाडा टोलनाक्‍यावर पोहोचले. त्‍यावेळी युवती तिथे गोंधळ घालत होती. कसे तरी करून तिला पोलिस ठाण्‍यात आणले. या ठिकाणी तिने अश्‍लील भाषेत पोलिसांना शिविगाळ केली. त्‍यामुळे पोलिस त्रस्‍त झाले. तिच्‍यासोबत नेमके काय झाले, कारमध्‍ये आणखी कुणी होते का, तिने स्‍वत:हून नशा केली की तिला कुणी असे करण्‍यास भाग पाडले, याचा तपास पोलिस करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...