आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्‍याने केला तिच्‍या अनैतिक संबंधाचा भांडाफोड, नवऱ्याने केली आत्‍महत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशा आणि तिचा प्रियकर राकेश. - Divya Marathi
आशा आणि तिचा प्रियकर राकेश.
सूरत (गुजरात) - सरथाणा येथील अॅम्ब्रॉयडरी फॅक्ट्रीचे मालक हितेश छागनभाई बेलडिया यांची पत्‍नी आशाने 'काजल' नावाने बनावट फेसबूक खाते तयार करून त्‍याच्‍यासोबत चॅटिंग केली. एवढेच नाही तर प्रियकरासोबत लग्‍न करण्‍यासाठी हितेश यांना मानसिक त्रास देऊन आत्‍महत्‍या करण्‍यास भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी आशा आणि तिच्‍या भावाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला. प्रियकर फरार आहे.
पाच वर्षांच्‍या मुलाने केला होता अनैतिक संबंधाचा भांडाफोड...
- आत्‍महत्‍येपूर्वी हितेश यांनी सुसाईट नोट लिहिली.
- पत्‍नी आशाने आपल्‍याला कसा मानसिक त्रास दिला, याचा पाठाच यात त्‍यांनी वाचला.
- सहा महिन्‍यांपूर्वी आशा ही संत्‍सगाचे निमित्‍त करून नागपूरला गेली होती. सोबत पाच वर्षांचा चिमुकलासुद्धा होता.
- मात्र, नागपूरला आशासोबत तिचा प्रियकर राकेश धामेलिया गेला.
- त्‍या ठिकाणी संत्‍सगाच्‍या कार्यक्रमात भाग घेण्‍याऐवजी आशा आणि राकेश पती - पत्‍नीप्रमाणे हॉटेलमध्‍ये राहिले.
- घरी आल्‍यानंतर चिमुकल्‍याने या बाबत वडील हितेश यांना माहिती दिली.
- ते ऐकून त्‍यांना धक्‍का बसला.
पतीलाच केले ब्‍लॅकमेल
- नंतर आशाने 'काजल' नावाने फेसबूकचे बनावट खाते तयार केले आणि हितेशला फ्रेंड रिक्‍वेस्‍ट पाठवली.
- ती काजल नावानेच त्‍याच्‍यासोबत चॅटिंग करत होती.
- मात्र, हे खाते बनावट असल्‍याचा संशय हितेश यांना आला.
- त्‍यांनी काजलला भेटायला बोलवले.
- त्‍यावरून आशा भडकली आणि तुम्‍ही विवाहबाह़्य संबंध ठेवता म्‍हणून माहेरी निघून गेली.
घटस्‍फोटासाठी दिला त्रास
हाच मुद्दा पकडून तिने हितेश यांना घटस्‍फोटासाठी त्रास देणे सुरू केले. त्‍यातूनच त्‍यांनी विष पिऊन आत्‍महत्‍या केली.

पुढील स्लाइड्सवर संबंधित PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...