अहमदाबाद- लग्न झाल्याच्या दुसऱ्याच आठवड्यापासून सासरा केव्हाही मिठी करायचा. कुठेही किस करायचा. तिने नकार दिला. पतीकडे तक्रार केली. तर पती बेदम मारायचा. चारित्र्यावर संशय घ्यायचा. याची तक्रार सासूकडे केली तर ती म्हणायची, की सासरा तुझी परिक्षा घेत आहे.
अहमदाबादच्या तरुणीने अगदी अंगावर काटा उभा करणारी
आपबिती सांगितली आहे. अखेर तिने या प्रकाराविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे.
या तरुणीचे लग्न सावन नितीनभाई मेहता याच्यासोबत पाच महिन्यांपूर्वी झाले होते. लग्न झाल्याच्या दुसऱ्याच आठवड्यात सासऱ्याने तिला मिठी मारणे. कुठेही किस करणे. असे प्रकार सुरु केले. या सासऱ्याचे नाव नितीनभाई घनश्यामभाई मेहता असे आहे. तिने याचा विरोध केला. तेव्हा सासरा म्हणायचा, घरी एवढ्या सुविधा हव्या असतील तर असे करावेच लागेल. नाहीतर घर सोडून जावे लागेल.
तिने याची तक्रार पती नितीनभाईकडे केली. त्याने वडीलांना समज न देता तिलाच मारहाण करण्यास सुरवात केली. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिलाच नीट राहण्यास बजावले.
एक महिला म्हणून सासू तरी किमान समजून घेईल असे तिला वाटले होते. तिने त्यांना सर्व प्रकार सांगितला. तर त्यांनीही आश्चर्याचा धक्काच दिला. सासरे तुझी परिक्षा घेत आहेत. ही परिक्षेची वेळ आहे, असे सांगून निर्लज्जतेचा कळस गाठला.
पुढील स्लाईडवर बघा, या बातमीवर तयार केले पॅकेज... नवरा आणि सासऱ्याचा फोटो...