आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे चुलत भाऊ करतात पेट्रोल पंपावर काम, राहतात लहानशा घरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींचे चुलत भाऊ भरतभाई हे वडनगरपासून 65 किलोमीटर अंतरावर एका पेट्रोलवर काम करतात. ते आठवड्यातून एकदा घरी जातात. - Divya Marathi
मोदींचे चुलत भाऊ भरतभाई हे वडनगरपासून 65 किलोमीटर अंतरावर एका पेट्रोलवर काम करतात. ते आठवड्यातून एकदा घरी जातात.
अहमदाबाद- पालनपूर लगत असणाऱ्या लालवाडा या गावात तुम्ही पेट्रोल पंपावर उभे आहात आणि कोणी तुमच्या वाहनात पेट्रोल टाकत आहे. त्यावेळी जर कोणी तुम्हाला म्हणाले की हे पंतप्रधान मोदींचे भाऊ आहेत तर आश्चर्यचकित होऊ नका. तो खरोखरच पंतप्रधान मोदींचे चुलते नरसिंहदास मोदी यांचे पुत्र भरतभाई मोदी असू शकतात. भरतभाई हे वडनगर पासून 65 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या पेट्रोल पंपावर काम करतात. ते 55 वर्षांचे आहेत. ते आठवड्यातुन एकदाच घरी जातात.
 
पत्नी राहते वडनगरमध्ये
- भरतभाई यांची पत्नी वडनगरमध्ये राहते. ती एका छोट्या घरातून लोकांना रोजच्या गरजेच्या वस्तू विकते. भरतभाई यांचे मासिक वेतन केवळ 6 हजार रुपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणखीही चुलत भाऊ आहेत. त्यांच्याबद्दलही अतिशय आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. भरतभाई यांचे लहान भाऊ अशोकभाई हे वडनगरच्या बाजारात पतंग, फटाके आणि नाश्त्याचे पदार्थ विकतात. त्यांनी एक छोटेसे दुकान भाड्याने घेतलेले आहे. त्यांची पत्नी विनाबेन या एक जैन व्यावसायिकाकडून मोफत अन्नवाटप करण्यात येणाऱ्या दुकानात काम करतात. अशोकभाई हे कढी आणि खिचडी बनवतात. विनाबेन या ठिकाणी भांडी स्वच्छ करतात. त्यांचे तिसरे भाऊ चंद्रकांत हे अहमदाबाद येथे एका धर्मादाय संस्थेच्या गोशाळेत काम करतात.
 
मोदींच्या वडिलांचे आहेत 5 भाऊ
- त्यांचे अन्य दोन भाऊ सुध्दा याच पध्दतीचे जीवन जगत आहेत. अरविंदभाई हे जवळपासच्या गावांमध्ये फिरुन तेलाचे जुने पिंप गोळा करतात. तर भोगीभाई हे न्याहरीचे दुकान चालवतात. नरसिंहदा हे भाऊ दामोदारदास यांच्या प्रमाणेच वडनगर रेल्वे स्थानकाजवळ चहाचे दुकान चालवतात. नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे 5 भाऊ होते. नरसिंहदास, नरोत्तमदा, जगजीवनदास, कांतीलाल, जयंतीलाल, कांतिला आणि जयंतीलाल हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. जयंतीलाल यांची मुलगी लीनाबेन यांचे पती वीसनगर येथे बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...