आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या नावावर मॉडेलने उतरवले कपडे, भाजपच्या प्रचारासाठी निवडला अनोखा मार्ग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे. यात काही हवशे, नवशेही आहेत. देशभरात नरेंद्र मोदींचे जोरदार वारे वाहात आहे. मोदींच्या या हवेचा फायदाही काही जण उचलताना दिसत आहेत.
मोदींची फार मोठी फॉलोअर असल्याचे सांगत, त्यांच्या प्रचारासाठी गुजरातच्या एका अभिनेत्रीने न्यूड फोटोशूट केले आहे. या अभिनेत्रीचे नाव मेघना पटेल आहे. तिचे हे प्रचार तंत्र इंटरनेटवर व्हायरल होत असतानाच मोदींसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. सोशल साइट्सवर मेघनाच्या फोटोशूटवर जोरदार टीका होत असताना, संस्कृतिचा टेंभा मिरविणा-या आणि अश्लिलतेच्या विरोधात उभ्या राहणा-या भाजपकडून यावर सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
मेघनाने न्यूड फोटोशूट करुन पूनम पांडे, रोजलिन खान यांच्या पंगतीत स्वतःला सामील करुन घेतले आहे. तिने एका फोटोमध्ये निर्वस्त्र होत लाज झाकण्यासाठी केवळ मोदींचे एक छायाचित्र हातात धरले आहे. तर, दुस-या एका छायाचित्रात मेघना भाजपचे प्रचार चिन्ह असलेल्या कमळांवर पहुडलेली असून तिच्या अंगावरही कमळ आहेत.
भाजपकडून मेघनाच्या या प्रचार तंत्रावर अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी, तिचा हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे मानले जात आहे.
काही मोजक्या हिंदी चित्रपटांसह मेघना भोजपूरी चित्रपटांमध्ये झळकली आहे. याआधी रोझलीन खानने अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी अशाप्रकारचे फोटोसेशन केले होते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मेघनाचा मोदींसाठीचा प्रचार..