आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरड्या विहिरीला लागले चमत्कारी पाणी, आजार बरा करण्यासाठी लोकांची चार किमी रांग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात) - जगात नेहमीच काहीना काही असे घडत असते, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. काही त्याला श्रद्धा म्हणतात तर, काही अंधश्रद्धा. असेच काही बडोद्यातील करखडी गावात घडले आहे.
करखडी येथील अनेक वर्षे जून्या वेराईमाता विहीरीला अचानक झरे फुटले आणि कोरडी पडलेली विहिर पाण्याने काठोकाठ भरली आहे. गणेश चतुर्थीच्या दरम्यान ही घटना घडली. कोरड्या विहिरीला पाणी लागण्याची घटना काही नवीन नाही. असे अनेक गावांमध्ये घडत असते. मात्र, करखडी येथील विहिरीचे पाणी एका आजारी व्यक्तीने प्याले आणि त्याला अचानक बरे वाटायला लागले. त्यानंतर त्याने त्या विहिरीतील पाणी कँसरग्रस्त त्याच्या नातेवाइकासाठी नेले आणि त्यालाही आजारातून मुक्ती मिळाल्याचा अनुभव आला.
मग काय, ही बातमी वणव्यासारखी पसरली. काही तासांतच विहिरीवर पाणी घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली. दुसर्‍या दिवशी शेकडोच्या संख्येने लोक पाणी घेण्यासाठी आले. तिसर्‍या दिवशी लोकांची विहिरीच्या पाण्यासाठी झुंबड उडाली. वेराईमाता विहिरीच्या पाण्यासाठी लोक चार किलोमीटर पर्यंत रांगेत उभे होते. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिस बंदोबस्त लावावा लागला. आता अशी परिस्थिती आहे, की शेकडो लोक तीन-चार दिवस वाट पाहात आहेत.

अशीच घटना काही दिवसांपूर्वी मुंबईत घडली होती, मुंबईतील माहिमच्या समुद्राचे खारे पाणी गोड झाल्याची ती अफवा होती. समुद्राचे पाणी गोड झाल्याची अफवा ऐकून अनेकांनी ते पाणी बाटलीमध्ये भरून नेले होते. त्याची तपासणी केल्यानंतर ते 'गोड' पाणी आरोग्यासाठी अपयाकारक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले होते.

करखडी हे गाव बडोदा जिल्ह्यात आहे. येथील वेराईमाता विहिरीच्या पाण्याचा चमत्कार सध्या आसपासच्या गावातील लोक अनुभवत आहेत. ही विहीर 150 फूट खोल आहे. विहिरीच्या चहुबाजूंनी दगडांची छान नक्षी आहे, तसेच देवीची मुर्ती कोरलेली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, विहिरीचे छायाचित्र आणि लोकांचे अनुभव व करखडी येथे उसळलेली गर्दी