आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi As PM: NaMo Tea At Mani Shankar Aiyar Tea Stall In Vadodara

मोदींच्या मतदारसंघात सुरू झाले मणिशंकर अय्यर टी स्‍टॉल, आज नमो चहा मोफत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - चहावाला म्हणून नरेंद्र मोदींवर टीका करणा-या मणिशंकर अय्यर यांना नरेंद्र मोदींच्या एका समर्थकाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मोदींच्या मतदारसंघात म्हणजे बडोद्यात एक टी स्टॉल सुरू केला आहे. त्या टी स्टॉलचे नाव मणिशंकर अय्यर असे ठेवले आहे.
आज मोदी ज्यावेळी शपथ घेत असतील त्याचवेळी या टी स्टॉलचे उद्घाटन होणार आहे. बडोदा रेल्वे स्थानकाच्या मागे फरामजी रोडवर हे टी स्टॉल सुरू करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर मोदींच्या पंतप्रधान बनण्याच्या आनंदात लोकांना मोफत नमो चहाचे वाटप केले जाणार आहे.
मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत मोदींवर जहरी टीका केली होती. मोदी पंतप्रधान तर बनू शकणार नाहीत, मात्र आम्ही त्यांना काँग्रेसच्या बैठकीत चहावाल्याचे काम देऊ शकतो, असे अय्यर म्हणाले होते. त्यानंतर भाजपने चहावाल्याचा हाच मुद्दा निवडणुकीचे अस्त्र म्हणून वापरला व 'चाय पे चर्चा' नावाचे एक मोठे अभियानही राबवले होते.

एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार मोदींच्या यशाचा गौरव करण्यासाठी निकितन कॉन्ट्रॅक्टर नावाच्या एका समाजसेवकाने हा टी स्टॉल सुरू केला आहे. येथे नमो चहाबरोबरच एक खास वेस्ट एशियन डीशही उपलब्ध असेल.
वाराणसीत कसा आहे उत्साह...पाहुयात पुढील छायाचित्रांत...