आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयी मुद्रेने सुरू झाला मोदींचा दिवस, मात्र राजीनामा बॉम्बमुळे आनंदावर विरजण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोमवारच्या दिवसाची सुरुवात विजयी मुद्रेने झाली. परंतु नंतर ते पोटनिवडणुकीतील विजयी भाजप उमेदवारांच्या शपथग्रहण समारंभात दाखल झाले तेव्हा आत्मविश्वासापासून खूप दूर गेल्यासारखे दिसले. सकाळी साडेअकराच्या सुमारास मोदी मुख्यमंत्री कार्यालयात दाखल झाले. त्याच वेळी त्यांना अडवाणींच्या राजीनाम्याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी राजनाथसिंह यांच्याशी फोनवरून चर्चा केली. राजीनाम्याचा बॉम्ब पडल्यानंतर मोदी आणि मंत्रिमंडळातील सहका-यांच्या चेह-यावरील आनंद पार विरून गेला.


आता मोदींसमोर तीन पर्याय
> अडवाणींच्या राजीनाम्याच्या बॉम्बकडे दुर्लक्ष करणे.
> स्वत: नवीन जबाबदारीचा राजीनामा देऊन हीरो होणे.
> सर्व निर्णय पक्षावर सोडून मोकळे होणे.


दोन प्रयत्नांनंतर गुरूंशी होऊ शकली चर्चा
राजीनाम्याचे कळल्यानंतर मोदींनी आपले राजकीय गुरू अडवाणींशी फोनवरून बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्या वेळी संपर्क झाला नाही. नंतर मोदींनी आपले निकटवर्ती अमित शाह यांना अडवाणी व भाजपाध्यक्षांच्या घरी पाठवले, तेव्हा चर्चा होऊ शकली, ज्यात मोदींनी राजीनामा परत घेण्यासाठी आग्रह केला.


बोर्डाचा निर्णय मान्य
पक्षाध्यक्षांनी संसदीय बोर्डाची तातडीची बैठक बोलावली. सदस्य असलेल्या मोदींनाही निरोप गेला. मात्र ‘एवढ्या तत्काळ दिल्लीत येणे कठीण असल्याचे मोदींनी कळवले. जो निर्णय घ्याल तो मान्य असेल,’ असेही नमूद केले.