आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिखलफेक करणाऱ्यांचा आभारी आहे, यामुळे कमळ सहजच उमलणार: गुजरातेत नरेंद्र मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी नरेंद्र मोदी सोमवारी गुजरातेत पोहोचले. सर्वात प्रथम त्यांनी आशापुरा देवीचे दर्शन घेतले. उपस्थितांशी हस्तांदोलनही केले. भुजच्या रॅलीमध्ये मोदी म्हणाले की, चिखलफेक करण्यासाठी काँग्रेसचा आभारी आहे. काँग्रेसने एवढी चिखलफेक केली की यामुळे आता कमळ उमलणे सोपे झाले आहे. भुजनंतर मोदी गुजरातेत 3 रॅलीज आणखी करतील. यानंतर ते 29 नोव्हेंबरपासून पुन्हा प्रचाराची धुरा वाहणार आहेत. गुजरातेत 9 आणि 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत निवडणुका आहेत. निकाल 18 डिसेंबरला येतील.

 

काँग्रेसला गुजरात माफ करणार नाही...
- भुजमध्ये मोदी म्हणाले, मी आशापुरा देवीचे आशीर्वाद घेतले. गुजरातेत 182 मतदारसंघांत निवडणुका होणार आहेत. विरोधकांनी आमच्यावर चिखलफेक केली. मी चिखलफेक करणाऱ्यांचा मनापासून आभारी आहे. आता या चिखलामुळे कमळ उमलणे सोपेच झाले आहे.
- गुजरातच्या कानाकोपऱ्यात आशीर्वादासाठी निघालो आहे. काँग्रेसला गुजरात कधीच माफ करणार नाही. सरदार पटेल यांच्या काळात काँग्रेसने गुजरातला मागे टाकले.

- काँग्रेसने नेहमी गुजरातबाबत वैरभाव ठेवला. 30 वर्षांपूर्वी कुणी विचारही केला नव्हता, येथे माता नर्मदेचे पाणी मिळेल. कच्छमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे लोकांना पलायनही करावे लागले होते.

- कच्छची परिस्थिती अशी होती की, येथे कोणी नोकरी करण्यासाठीही तयार नव्हता. काही वर्षांपूर्वी कच्छमध्ये भीषण भूकंप आला. अटल बिहारी वाजपेयींनी मला म्हटले की, आता तुम्हाला काम करावे लागेल. मी मुख्यमंत्री बनलो आणि कच्छच्या नागरिकांची मदत करण्यासाठी मैदानात उतरलो.

 

आम्ही वाळवंटात केसर फुलवले
- मोदी म्हणाले, विकास आमच्या सरकारचा मूलमंत्र आहे. येथे शेती होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. एकीकडे वाळवंट आणि दुसरीकडे पाकिस्तान. आज हेच कच्छ कृषी क्षेत्र आहे. मी येथील शेतकऱ्यांसाठी सर्वात प्रथम सॉइल हेल्थ कार्ड स्कीम आणली.
- आम्ही कच्छच्या वाळवंटात केसर फुलवले. आधी केसर फक्त जम्मू-काश्मिरातच पिकायचे.
- कच्छला आम्ही पर्यटन स्थळ आणि हँडिक्राफ्टचे केंद्र बनवले. आता अवघे जग म्हणते, कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा. एकदा विकासासोबत चला, वंशवादाची पीछेहाट होईल.

असा आहे मोदींचा कार्यक्रम
- भुजनंतर ते सौराष्ट्रच्या जसदण (राजकोट) ला जातील. विछिया रोडवर एका सभेला संबोधित करतील.
- यानंतर मोदी अमरेलीच्या चलाला येथील गायत्री मंदिर मैदानात एका सभेला संबोधित करतील.
- मोदींची शेवटची रॅली सुरतच्या कडोदरा येथे हनुमान मंदिरात होईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर  पाहा, आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...