आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी लखनऊतून लोकसभा निवडणूक लढणार; अडवाणी, यांचीही यूपीला पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे राजकीय गुरू ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आगामी लोकसभेची निवडणूक उत्तर प्रदेशातून लढवण्याची शक्यता आहे. मोदी हे लखनऊ किंवा अयोध्येतून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहू शकतात. मात्र, अद्याप त्यांच्या जागांविषयी निर्णय झालेला नाही. मोदी यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा याबाबत चाचपणी करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या दौ-यावर गेले आहेत.


मोदींसाठी अत्यंत सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची
जबाबदारी शहा यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे शहा हे सहा जुलै रोजी अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले जाते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लखनऊ अथवा अयोध्या लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी आपले भाग्य आजमावण्याची शक्यता आहे.


दिग्गजांना हवा सुरक्षित मतदारसंघ
मोदींप्रमाणेच भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह, अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्यासाठीही सुरक्षित मतदारसंघ शोधला जात आहे. हे तीनही दिग्गज उत्तर प्रदेशातूनच लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.


मोदींची पहिली बैठक आज
मोदींच्या अध्यक्षतेखालील निवडणूक प्रचार समितीची पहिली बैठक आज 4 जुलै रोजी नवी दिल्ली येथे होत आहे. मोदींच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच बैठक आहे. यामध्ये प्रचारमोहीम, रणनीतीबद्दल विचारविनिमय केला जाणार आहे. बैठकीत प्रचार समिती, निवडणूक जाहीरनामा, निवडणूक व्यवस्थापन समित्यांची स्थापना केली जाऊ शकते. त्याचे नेतृत्व अडवाणी गटाकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.