आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Money Bag Found To Kolhapur Beggar News In Divya Marathi

कोल्हापुरच्या भिकार्‍याला बॅगमध्ये सापडले 52 लाख रुपये, भारत भ्रमण करताना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - पैशांची बॅग आणि भिकारी संजय

अहमदाबादः
कोल्हापूराच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागणार्‍या भिकार्‍याला रेल्वेते कोच झाडताना 52.47 लाख रुपयांची बॅग मिळाली. एवढे पैसे मिळाल्याने हा भिकाही काही काळाकरीता का होईना पण लखपती बनला होता. आपल्याकडे भरपूर पैसे आहेत त्यामुळे आपण भारत भ्रमण करावे अशी कल्पना त्या भिकार्‍याच्या मनात आली. सर्वात पहिले तो मुंबईवरून अहमदाबादला आला. हा भिकारी ती रुपयांनी भरलेल्या बॅग घेऊन नारोल भागातून जात असताना तेथील पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी ताबडतोब त्याची चौकशी केली. यामध्ये पोलिसांना भिकार्‍याजवळील लाखो रुपयांची नकद मिळाली. भिकार्‍याची चौकशी केल्यावर त्याने संपूर्ण घटना सांगितली. या भिकार्‍याचे नाव संजयसिंग विजयसिंग माथूर असे असून त्याच्याजवळून पोलिसांना 1000 रु. आणि 500 रुपयांचे बंडल मिळाले आहेत.
संजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर भिक मागतो. भिकेतून मिळालेल्या पैशाने दारू पिऊन स्टेशवरच पडून राहतो. दोन दिवसांपूर्वी एका रेल्वेच्या डब्याची साफ सफाई करताना मला एक बॅग मिळाली. या बॅगमध्ये कपड्यांच्या खाली कागदात लपटून लाखो रुपये ठेवण्यात आले होते. एवढे रुपये पाहून मला क्षणासाठी असे वाटले की, माझी लॉटरीच लागली आहे. मी या पैशाने भारत भ्रमण करणार होतो. त्यामध्ये सर्वात पहिले मी वैष्णो देवीला जाणार होता. मात्र एवढे पैसे घेऊन जास्त दूर जाणे योग्य नाही. त्यामुळे मी वोल्वो बसने मुंबईवरून अहमदाबादला आलो.
पोलिसांनी व्यक्त केल्या तीन शक्यता
1- कोल्हापूर म्हणजे सराफांचे हब आहे. त्यामुळे एखादा व्यापारी पैसे घेऊ निघाला असेल आणि त्याने बॅग विसरली असेल.
2- आंगडिया पेढीचा एखादा कर्मचारी डिलेव्हरी देण्यासाठी गेला असेल आणि या भिकार्‍याने ही बॅग चोरली असेल.
3- सध्या महाराष्ट्रात निवडणूकीचे वातावरण आहे, त्यामुळे एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याने ही रक्कम आणली असेल. मात्र तपासणीमुळे ही बॅग येथेच सोडून पळून गेला असेल.