आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घटनेनुसार 50% पेक्षा जास्त आरक्षण शक्य -हार्दिक पटेल; सत्ता आल्यास काँग्रेस देणार आरक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी बुधवारी गुजरातमध्ये सरकार आले तर काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देईल, असे जाहीर केले. इतर वर्गांचे सध्याचे ४९% आरक्षण कायम ठेवून पाटीदारांना वेगळे आरक्षण दिले जाईल, असे पटेल म्हणाले. घटनेनुसार ५०% हून जास्त आरक्षण देणे शक्य असल्याचा दावाही हार्दिक पटेल यांनी  केला.


दरम्यान, गुजरातचे उपमुख्यमंत्री िनतीन पटेल यांनी काँग्रेस व हार्दिक पटेल मिळून जनतेची दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे सरकार राज्यात येताच आरक्षणाबाबत विधेयक मांडून मंजुरी दिली जाईल, असे हार्दिक म्हणाले. यासाठी मंडल आयोगाच्या २२ निकषांआधारे सर्वेक्षण केले जाईल. १९९४ नंतर ९ राज्यांत ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण देण्यात आले असल्याचा दाखलाही दिला.

बातम्या आणखी आहेत...